Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित
सौर ऊर्जा प्रकल्प राबविणारे पहिले विद्यापीठ
BOI
Monday, September 10, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this story

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, गजानन नाबर आदी मान्यवर

पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ हे देशातील पहिले ‘स्मार्ट सौर विद्यापीठ’ ठरले आहे. विद्यापीठात पहिल्या टप्प्यात २३४ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, यामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या उपस्थितीत झाले.

‘क्लिनमॅक्स सोलर’कंपनीने हा प्रकल्प उभारला आहे.विद्यापीठात ६०२ किलोवॅटचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याद्वारे आठ लाख ९० हजार किलोवॅट वीज निर्माण करणे अपेक्षित असून, त्यातून पुढील २५ वर्षात, प्रतिवर्ष ७३१ टन कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जन कमी होऊ शकणार आहे. हे उत्सर्जन कमी करणे म्हणजे, १७ हजार ४२० पूर्ण वाढलेली झाडे लावण्यासमान आहे. 

या वेळी क्लिनमॅक्स सोलरचे सीइओ गजानन नाबर म्हणाले, ‘हा प्रकल्प रेस्को अथवा ओपेक्स मॉडेलवर आधारित असून, क्लिनमॅक्स सोलर सध्याच्या विजेच्या ग्रीड दरांपेक्षा कमी दरात सौर ऊर्जा विद्यापीठाला देणार आहे. हा उपक्रम पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या आराखड्याचाच एक भाग आहे. पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ख्याती असलेले पुणे शहर हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. पुणे विद्यापीठ ज्ञान विकासात नेहमीच आघाडीवर राहिले आहे. सावित्रीबाई पुणे विद्यापीठाकडून सौर ऊर्जेचा स्वीकार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांना सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी मदत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’

‘पाषाण रोडवर तीन किमीच्या पट्ट्यात दोन मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याद्वारे कार्बन उत्सर्जन दोन हजार ४६२ टनांनी कमी होईल. पुणे विद्यापीठासह आयआयएसइआर (७८८ किलोवॅट ), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (२३० किलोवॅट) आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (४३०किलोवॅट)येथेही सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षात पुण्यात हवेचा घसरणारा दर्जा बघता, आघाडीच्या संस्था आणि संघटना यांनी अशा प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जा स्वीकारणे आवश्यक आहे’,असेही नाबर यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link