Next
प्रख्यात प्रायोगिक नाटककार सतीश आळेकर रत्नागिरीमध्ये
BOI
Wednesday, June 20, 2018 | 02:24 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : आपल्या अनवट नाटकांनी मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीला वेगळे वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकीर्दीचा आणि नाट्यकृतींचा उलगडलेला प्रवास म्हणजे ‘गगनिका’ हे त्यांचे अनोखे पुस्तक. या पुस्तकातली काही प्रकरणे त्यांच्याचकडून ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. रमेश कीर कला अकादमीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आळेकर रत्नागिरीकरांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असून, ‘गगनिका’तील काही प्रकरणांचे प्रकट वाचनही ते करणार आहेत.

हा कार्यक्रम २८ जून २०१८ रोजी सायंकाळी चार वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे होणार आहे. समकालीन व आधुनिक भारतीय रंगभूमीवर मराठी रंगभूमीचे योगदान वाखाणण्यासारखे आहे. या मॉडर्न थिएटरवर ठळकपणे ठसा उमटवणाऱ्या नाटककारांचा विचार करता विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांची नावे निर्विवादपणे ठळक होतात. या प्रत्येक नाटककाराने प्रचलित नाट्यशैलीची आशय विषयांसहित चौकट मोडून स्वतंत्र आणि नवाभिव्यक्तीची नाटके निर्माण केली जिची जागतिक रंगभूमीनेही दखल घेतली. असंगत नाट्यकृतीतून आपला सामाजिक भोवताल, राजकीय वर्तमान आणि मानसिक बेशिस्तीचे विसंगतपणे पण वास्तवदर्शी भान निर्माण करणारे नाटककार म्हणजे सतीश आळेकर.

आळेकरांनी लिहिलेली ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘मिकी आणि मेमसाब’ आदी नाटके मराठी रंगभूमीवरच नाही, तर जागतिक रंगभूमीवरही चर्चेत राहिली आणि आजही आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नाटकांसाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ या मानाच्या भारतीय  पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, २८ जून २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : ज. शं. केळकर सेमिनार हॉल, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.
संपर्क : रमेश कीर कला अकादमी (रत्नागिरी)- ९९७५३ ०२२२८

(सतीश आळेकर यांची विशेष मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराबद्दलच्या सतीश आळेकर यांच्या आठवणी वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.सतीश आळेकरांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search