Next
‘महाबँके’च्या कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
केरळ पूरग्रस्तांसाठी दिला एक दिवसाचा पगार
प्रेस रिलीज
Friday, November 02, 2018 | 05:07 PM
15 0 0
Share this article:

केरळ : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी केरळच्या आपत्तीग्रस्तांसाठी केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी आपले एक दिवसाचे वेतन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. यातून सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली.

तिरुवनंतपुरम येथे अलीकडेच झालेल्या विशेष कार्यक्रमात बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राउत यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख दोन हजार एकशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांच्याकडे ना सोपविला.

या कार्यक्रमास चेन्नई विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार सिंह यांच्यासह अन्य बँक अधिकारी उपस्थित होते.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search