Next
‘पेटीएम’ची रिकरिंग पेमेंट्स सेवा
प्रेस रिलीज
Tuesday, April 30, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील सर्वांत मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’ने आपल्या व्यापार्‍यांसाठी रिकरिंग पेमेंट सेवा सुरू केली आहे. ‘पेटीएम’वर दरमहा ४०० दशलक्षपेक्षा अधिक व्यवहार होतात. हे फीचर जोडून, आपल्या यूझर्सकडून विनासायास पेमेंट गोळा करण्यासाठी सब्स्क्रिप्शन आधारित व्यवसायांना सुसज्ज करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. 

आपल्या सब्स्क्रिप्शनच्या फ्रिक्वेंसी अनुसार, ऑटोमॅटिक बिलिंगसाठी उपभोक्ते ‘पेटीएम’वर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएमच्या मालकीची इन्स्ट्रुमेंट यापैकी पेमेंटची पद्धत निवडू शकतात. या सेवेमुळे बिल पेमेंट्स, कंटेन्ट सब्स्क्रिप्शन, किराणा खरेदी, सभासदत्व शुल्क, हाउसिंग सोसायटी पेमेंट्स व इतर अनेक वाढत्या यूज केसेससाठी पेमेंट करणे अधिक सुलभ होईल.  

या विषयी बोलताना ‘पेटीएम’चे सीओओ किरण वासीरेड्डी म्हणाले, ‘आमच्या व्यापारी भागीदारांच्या बदलत्या पेमेंट गरजा पुरवण्यासाठी नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी शोधून काढण्यासाठी आम्ही सतत गुंतवणूक करत आहोत. सोयीस्कर असे रिकरिंग पेमेंट्स हा सब्स्क्रिप्शन व्यवसायांचा एक महत्त्वाचा घटक आहे. हे फीचर आपल्या पेमेंट गेटवेवर जोडून व्यापारी आता आपल्या सब्स्क्रिप्शन ऑफरिंगसाठी लक्षावधी यूझर्सपर्यंत पोहोचू शकतात. आम्हाला आशा आहे की या नवीन फीचरमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही एकसारखाच फायदा होईल.’

‘पेटीएम पेमेंट्स गेटवे’ने आपला व्यापारी बेस झपाट्याने वाढवला आहे. ज्यात इन्स्टंट प्लग अँड पे ऑफरिंगपासून ते डीप मर्चंट प्लॅटफॉर्म इन्टिग्रेशनपर्यंत पेमेंटची व्यापक सोल्युशन्स आहेत. पेमेंटचा अनुभव सहज करण्यावर आणि इतर सर्व तृतीय पक्षी मंचांशी सुलभ इन्टिग्रेशन करण्यावर त्यांचा फोकस आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट्स (SDKs), डेव्हलपर APIs आणि सुरक्षित चेकआउट सोल्युशन्स ऑफर करून त्यांनी लहान मोठे सर्व व्यवसाय अधिक मजबूत केले आहेत आणि त्यांच्या ग्राहक पेमेंट गरजा पुरवल्या आहेत.

‘पेटीएम’ देशातील प्रथम ओम्नीचॅनल डिजिटल पेमेंट्स प्रदाता असून, यात पेमेंट सोल्युशन्सची व्यापक विविधता आहे व त्याचबरोबर ई-मेल, एसएमएस, चॅट आणि अशा विविध चॅनल्समार्फत पेमेंट स्वीकारण्याची लवचिकतादेखील आहे. आज आयआरसीटीसी, झोमॅटो, ओयो रूम्स, ग्रोफर्स, स्विगी, बिग बास्केट आणि आयडिया व इतर अनेक ऑनलाइन व्यवसायांचा हा पसंतीचा पेमेंट गेटवे आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search