Next
‘मोदींचे नेतृत्त्व आणि विकासाच्या मुद्द्याचा विजय’
प्रेस रिलीज
Tuesday, December 19 | 11:20 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाने गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व आणि भाजपने सातत्याने मांडलेला विकासाचा मुद्दा यांचा विजय आहे. या विजयाबद्दल आपण पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि दोन्ही राज्यांतील भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी सोमवारी (ता. १८) सांगितले.

दानवे म्हणाले की, ‘भाजपने सातत्याने निवडणुकीत विकासाचा मुद्दा मांडला. विरोधकांनी हा मुद्दा डावलण्यासाठी जातीयवादावर भर दिला; पण गुजरातच्या मतदारांनी जातीयवादाला स्पष्ट नकार दिला. विकासाचा मुद्दा मान्य केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला जोरदार पाठिंबा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी देशभर पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी परिश्रम केले आहेत. गुजरातमध्येही त्यांनी बूथपातळीपर्यंत मजबूत पक्ष संघटना उभी केली. भाजपच्या केंद्र व राज्य सरकारचे काम तसेच पक्ष संघटनेचा प्रभाव यामुळे हा विजय मिळाला आहे. विकास हाच राजकारणाचा मुख्य मुद्दा आहे, हे या निकालांनी सिद्ध केले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link