Next
‘ग्रामीण विद्यार्थ्यांनाही संगणकाचे धडे मिळावेत’
प्रेस रिलीज
Friday, July 13 | 12:57 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे शहरी मुलांबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांनाही संगणकाचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. रायसोनी शिक्षण संस्थेच्या सहकार्यामुळे भावडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षर होतील,’ असा विश्वास हवेली तालुक्यातील भावडी गावचे सरपंच राहुल तांबे यांनी व्यक्त केला.

वाघोली येथील रायसोनी शिक्षण संस्थेच्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅंड मॅनेजमेंटतर्फे दत्तक घेतलेल्या भावडी गावच्या जिल्हा परिषद शाळेला तीन संगणक भेट देण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) गावात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी तांबे बोलत होते.

वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत ३० वेगवेगळ्या प्रकारची शेकडो झाडे लावण्यात आली. याप्रसंगी काशिनाथ तांबे, गणेश तांबे, दयानंद पाटील, प्रवीण कांबळे, रामदास हडगर, ज्ञानेश्वर गव्हाणे, सोमनाथ तांबे, शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा भोड, मंगेश चव्हाण, महेंद्र तांबे, उत्तम हडगर, जयश्री कर्डीले यांच्यासह भावडीतील ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.

संगणक दिल्याबद्दल रायसोनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, विश्वस्त संचालक अजित टाटीया, नागपूर केंद्राच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज व प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे यांचे राहुल तांबे यांनी आभार मानून विद्यार्थी याचा उपयोग जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्यासाठी करतील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सुर्यवंशी व एनएसएस कार्यक्रम अधिकारी रमेश पाटोळे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link