Next
महाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन
बँकेचे अधिकारी मिलिंद रथकंठीवार यांचा उपक्रम
BOI
Monday, September 16, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मिलिंद रथकंठीवार यांच्या रेखाचित्र प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी मिलिंद रथकंठीवार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव, डॉ. सुभाष काळे, डॉ. सुनिल देशपांडे,  श्याम भुर्के आदी

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८५व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थापकांना आदरांजली वाहण्यासाठी बँकेचे अधिकारी मिलिंद रथकंठीवार यांनी संस्थापकांसह, देशातील दिग्गज व्यक्तींची दोनशेपेक्षा अधिक चित्रे रेखाटली असून, या चित्रांचे ‘आयकॉन्स’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांच्या हस्ते सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी झाले.
 
या वेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले, ‘बँकेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थापकांना रेखाचित्रांद्वारे आदरांजली वाहण्याचा रथकंठीवार यांचा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य आहे. हे प्रदर्शन पाहून रथकंठीवार यांच्यावर ब्रह्मा आणि सरस्वती यांची कृपा असल्याची खात्री पटते.’


या वेळी बँकेचे संस्थापक कै. व्ही. जी. काळे यांच्या रेखाचित्राचे अनावरण त्यांचे नातू डॉ. सुभाष काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, भीमसेन जोशी, जे. आर. डी टाटा आदी दिग्गज व्यक्तींची रेखाचित्रे रथकंठीवार यांनी रेखाटली  आहेत. 

या कार्यक्रमाला बँकेचे माजी संचालक डॉ. सुनील देशपांडे, सरव्यवस्थापक शाम भुर्के,  वामन काळे, विश्वास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हे प्रदर्शन १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
A M MESHRAM About 34 Days ago
Very nice sketch by my dear friend
0
0
Gopal Joshi About 34 Days ago
The unique sketch gallery by Shri Milind Rathkanthiwar inaugurated today at the hands of Hon Shri A S Rajeev, MD & CEO Bank of Maharashtra. Stupendous & applaudable.
0
0
देशपांडे प्रकाश About 34 Days ago
अप्रतिम वर्णन मिलिंद रथकंठीवार यांच्या चित्रप्रदर्शनाच्या बातमीचे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र च्या स्थापना दिवसाचे
0
0

Select Language
Share Link
 
Search