Next
युज्ड कार डीलर्स असोसिएशनची स्थापना
येत्या शुक्रवारी उद्घाटन
BOI
Tuesday, September 24, 2019 | 03:06 PM
15 0 0
Share this article:

युज्ड कार डीलर्स असोसिएशनबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) प्रकाश उदेशी, विनोद अहिर, निलेश भागवत, अतुल जैन.

पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता यावी, ग्राहकांशी मध्यस्थीशिवाय छुपे खर्च न घेता व्यवहार व्हावेत आणि वापरलेल्या गाड्यांच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध व्हावी; तसेच विक्रेत्यांना मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने युज्ड कार डीलर्स असोसिएशन पुणेची (युसीडीएपी) स्थापना करण्यात आली आहे. 

‘या असोसिएशनचे उद्घाटन व ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार सोहळा येत्या शुक्रवारी, (२७ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता रेसिडेन्सी क्लब येथे होणार असून, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व व्हिंटेज कार संग्रहालयाचे सुभाष सणस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती ‘युसीडीएपी’चे अध्यक्ष विनोद अहिर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपाध्यक्ष सचिन साकोरे, सचिव निलेश भागवत, खजिनदार आशिष खंडेलवाल, राजेश ढवळे, मोहसीन सय्यद, प्रकाश उदेशी, अतुल जैन आदी उपस्थित होते.

विनोद अहिर म्हणाले, ‘असोसिएशनच्या माध्यमातून डीलर्सना ‘ऑटोकट्टा’ हे ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्राहकांशी थेट संपर्क करून चांगला आणि पारदर्शी व्यवहार करणे शक्य होणार आहे. आज अनेक ऑनलाइन पोर्टल्स आहेत. मात्र, त्यात अनेकदा फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात येते. आपल्या देशात आजही स्वतःच्या गाडीचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. त्यांना कमी व्याजदरावर अर्थसहाय्य मिळाले, तर या उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. भविष्यात असोसिएशनमार्फत वापरलेल्या गाड्यांचे मेळावे भरविणे, एका छताखाली वेगवेगळ्या गाड्या आणि डीलर्स आणणे यासह रस्ते सुरक्षा विषयक जागृतीपर कार्यक्रम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search