Next
आलटून पालटून
BOI
Friday, September 14 | 10:05 AM
15 0 0
Share this story

सामाजिक, राजकीय व धार्मिक अपप्रवृत्तींवर व्यंगचित्राद्वारे प्रहार करता येतो. ‘मनाला झालेला आनंद हाच त्या व्यंगचित्राचा अर्थ’ असे वर्णन करणारे मधुकर धर्मापुरीकर यांना ही आनंद ‘आलटून पालटून’मधून वाचकांमध्येही वाटला आहे.

अवतीभवती पाहताना, रोजच्या जीवनातील विविध प्रसंग अनुभवांना लेखकाला एखादे व्यंगचित्र आठवते. त्यावर भाष्य करताना त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे त्यांनी यातून सांगितले आहे. ‘हॅव ए नाइस डे’मधून त्यांनी पत्नीला शाळेत सेंडऑफ देतानाचा प्रसंग कथन करीत त्याला ‘लाफ्टर द बेस्ट मेडिसिन’ व एस. ग्रॉस याने काढलेले अंतराळवीरांच्या चित्रांची जोड दिली आहे.

तुरुंगातील कैद्यांसमोर व्यंगचित्रांच्या स्लाइड शोच्या कार्यक्रमप्रसंगी आलेला अनुभव व त्याला साजेशी व्यंगचित्रे अत्यंत बोलकी आहेत. सेम्पे या फ्रेंच व्यंगचित्रकाराचे रस्त्यावरून रपेट मारणारा माणूस आभाळाकडे पाहून टाटा करीत आहे आणि जमिनीवरील हिरवळीवर विमानाची पडलेली सावली हे चित्र पाहून लेखक खुश होतो. हा अनुभव दुसऱ्यांना सांगताना त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद त्या चित्रातील अर्थ शोधू लागतो. अशा अनेक चित्रकथानुभावातून वाचकांना वेगळा आनंद मिळतो.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन
पाने : १७६
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link