Next
‘रुग्णांना चांगल्या सुविधांसाठी ‘मुकुल माधव’ प्रयत्नशील’
प्रेस रिलीज
Saturday, July 07 | 12:35 PM
15 0 0
Share this story

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वाचन कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश छाब्रिया, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. रमेश भोसले, डॉ. हरीश टाटिया आदी.

पुणे : ‘ससून सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशन प्रयत्नशील आहे. येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना विश्रांतीसाठी प्रतीक्षा कक्ष आणि येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वाचनालयाचा लाभ होईल,’ असे प्रतिपादन फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश पी. छाब्रिया यांनी केले.

ससून रुग्णालयातील ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ प्रतीक्षा कक्षाचे उद्घाटन करताना प्रकाश छाब्रिया व इतर.फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर भागीदार असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रतीक्षा कक्ष आणि वाचनालयाचे उद्घाटन छाब्रिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ‘फिनोलेक्स’चे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, मुकुल माधव फाउंडेशनचे राजधर तिवारी, सचिन कुलकर्णी,  ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. रमेश भोसले, डॉ. हरीश टाटिया, डॉ. इब्राहिम अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्रांती कक्षछाब्रिया म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून फाउंडेशन ससून रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणासाठी प्रयत्न करीत आहे. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीबरोबरच नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वाचन कक्ष उभारला आहे. या विद्यार्थ्यांनी पुढे आपल्या गावी आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावांमध्ये चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या, तर देशाच्या विकासाला चालना मिळेल.’

अत्याधुनिक वाचन कक्षडॉ. चंदनवाले म्हणाले, ‘प्रतीक्षा कक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना बसता-झोपता येईल अशी सोय केली आहे. पिण्याचे पाणी, मोबाइल चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. वाचन कक्षातही चांगल्या प्रतीची टेबल्स, खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल, असे वातावरण वाचन कक्षात निर्माण झाले आहे.’

दरम्यान, छाब्रिया यांनी विविध वार्डांची पाहणी करून डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी आवश्यक गोष्टींची माहिती घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link