Next
‘मॉडर्न’मध्ये कागदी पिशव्यांवर कार्यशाळा
BOI
Monday, July 09, 2018 | 01:42 PM
15 0 0
Share this storyपुणे : येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा जुलै रोजी वर्तमानपत्रापासून पिशव्या बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्लास्टिक पिशव्यांपासून पर्यावरणाचे, प्राणीमात्रांचे, नद्यांचे होणारे नुकसान यांविषयी जागरूकता वाढावी याहेतूने ही कार्यशाळा घेण्यात आली.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर लोकांनी थांबवावा आणि  त्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बनविलेल्या ४५० पिशव्यांचे नागरिकांना मोफत वाटप करून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

या वेळी गंगोत्री ग्रुपचे व्यवस्थापक भूषण मलांडकर उपस्थित होते. त्यांनी बायो-प्लास्टिकसारख्या विघटनशील पदार्थावर संशोधन करून प्लास्टिकला कसा पर्याय उपलब्ध होऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी मॉडर्न अभियांत्रिकीच्या प्राचार्या डॉ. कल्याणी जोशी, उपप्राचार्य डॉ. सुहासिनी इटकर यांसह सात विभागांचे विभागप्रमुख, १२५ विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी प्रतिनिधी सुमंत रोकडे, रोहित तापकीर, फिलिप तडके, चिन्मय दाणी, मैत्रेय रांजणे, श्रीनिवास काळे यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Stephen Tadke About 222 Days ago
first Congratulations to every buddy specially All staff & students This is good idea & your affords 👍👍👍👍👍👍
0
0

Select Language
Share Link