Next
वाघोलीकर, शाह ‘वॉव अॅवार्ड’ने सन्मानित
BOI
Thursday, July 19 | 11:50 AM
15 0 0
Share this story



पुणे : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा ब्लिस इक्विटी प्रकाशनतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. यात संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर-शहा यांना ‘आयकॉनिक मोस्ट सेलिब्रेटेड बुक ऑफ द इयर’ (वॉव अॅवार्ड) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. या वेळी खासदार वंदना चव्हाण, मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आणि दारसिंग खुराना यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्लिस इक्विटी प्रकाशनच्या अध्यक्ष शोभा आर्य होत्या.

या कार्यक्रमामध्ये ऱ्हिदम आणि रचना यांच्यासह आशय वाघोलीकर, प्रतीक रोकडे, डॉ. सोनाली जाधव, गीता सिंग, संदीप सोपारकर, फ्रेडी दारुवाला, संगीता शेट्ये, अर्चना भिडे, अविनाश गवई, शर्वरी जमीनीस, अनुराधा करमरकर आदींना सन्मानित करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link