Next
गोष्ट छोटी.. डोंगराएवढी
आचरा डोंगरेवाडीतील ग्रामस्थांनी स्वखर्चाने श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती
BOI
Monday, September 03, 2018 | 10:17 AM
15 0 0
Share this article:मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरा गावातील तीन किलोमीटरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे दाद मागण्यात आली, लोकप्रतिनिधींकडेही तक्रार करण्यात आली; मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणि स्वतः श्रमदान करून या रस्त्याची दुरुस्ती केली आहे. निवडणुका आल्यावर विकासाची आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत गावकऱ्यांच्या या कृतीने चांगलेच अंजन घातले गेले आहे. आचरा देऊळवाडी-डोंगरेवाडी या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली होती. दगड उखडून खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे रिक्षाचालक या रस्त्यावरून गाडी नेण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे आजारी, वयोवृद्ध आदींना उपचारांसाठी डोलीतून उचलून नेण्याइतकी परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत येथील ग्रामस्थ दोन वर्षांपासून ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते; मात्र या प्रश्नात लक्ष घालायला कोणाला वेळ नसल्याने शेवटी ग्रामस्थांनीच एकत्र येऊन हे काम करायचे ठरवले. डोंगरेवाडी, मेस्त्रीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सिमेंट, खडी, काँक्रीटच्या साह्याने रस्त्याचे खड्डे बुजवले. त्यासाठी आर्थिक भारही त्यांनीच उचलला आणि श्रमदानही त्यांनीच केले. एक सप्टेंबर २०१८ रोजी सकाळपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. या कामात नाथा परब, विकास कावले, सुहास परब, संजय परब, नामदेव देसाई, नाना सावंत, सुहास सावंत, सुजित कोकम, राजा वायंगणकर, राजू परब, सतीश सावंत, बाळा चुरमुरे, प्रसाद मेस्त्री, नीलेश मेस्त्री, लवू मेस्त्री, दीपक धुरी, बाबू धुरी यांच्यासह वाडीतील वयोवृद्ध ग्रामस्थांसह सुमारे पन्नास ते साठ ग्रामस्थ सहभागी झाले होते. दीपक धुरी, संतोष सावंत यांनी गवत कापणी यंत्राने रस्त्यालगतचे गवत कापून रस्ता स्वच्छ केला. माजी सभापती नीलिमा सावंत यांनी या कामाला भेट देऊन कौतुक केले. 

ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून लोकप्रतिनिधींना एकीच्या बळाची किमया दाखवली आहे.

(सोबतचा व्हिडिओ पाहा...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 336 Days ago
👍👍👍
0
0

Select Language
Share Link
 
Search