Next
छपाक : अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मीची प्रेरक कथा
लक्ष्मीची भूमिका साकारणार दीपिका पदुकोन
BOI
Tuesday, March 26, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : २००५मध्ये घडलेल्या एका घटनेत अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवाल त्यानंतर मात्र अशा प्रकारच्या घटनांमधील पिडितांसाठी आधार बनली. त्यांच्यासाठी प्रेरणा बनली हे सर्वांनाच ठाऊक आहे. या लक्ष्मीची दखल आता बॉलीवूडनेही घेतली आहे. लक्ष्मीसोबत घडलेल्या घटनेवर आधारित छपाक हा चित्रपट येत असून अभिनेत्री दीपिका पदुकोन यात लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

दीपिका पदुकोनलक्ष्मीच्या भूमिकेतील दीपिकाचा फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून ती त्यात हुबेहुब लक्ष्मीसारखी दिसत आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावल्यानंतर चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला असतानाही खचून न जाता लक्ष्मीने तिच्यासारख्या असंख्य पिडितांना जगण्याचे बळ दिले. प्रेरणा दिली. तिच्या या संघर्षमयी जीवनाची कहानी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

लक्ष्मी अगरवाल२२ एप्रिल २००५ची ही घटना. दिल्लीतील एका गरीब कुटुंबात जन्मलेली लक्ष्मी जेमतेम १६ वर्षांची होती. तिच्यासोबत शिकणाऱ्या एका मैत्रीणीच्या ३१ वर्षीय भावाने तिला लग्नाची मागणी घातली. यावर आपण वयाने अजून खूप लहान असल्याने लग्नास तयार नाही, असे लक्ष्मीने स्पष्टपणे सांगितले. परंतु लग्नास नकार दिल्याने त्या मुलाने त्याची बहिण म्हणजेच लक्ष्मीच्या मैत्रीणीच्या साथीने लक्ष्मीवर  अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यातून लक्ष्मी वाचली खरी, पण तिच्या चेहऱ्यावर चार शस्त्रक्रीया कराव्या लागल्या आणि त्या करूनही तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला. 

तीन महिने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लक्ष्मीने तीन महिन्यांनंतर आपला चेहरा आरशात पाहिला आणि तिला खूप मोठा धक्का बसला. एखादी सर्वसामान्य मुलगी या परिस्थितीत खचून गेली असती, परंतु लक्ष्मीने त्या परिस्थितीला धीराने तोंड दिले. ती स्वतःच केवळ यातून सावरली नाही, तर तिने अशा प्रकारच्या हल्ल्यांना बळी पडणाऱ्या मुलींसाठी एक लढा उभा केला. अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या मुलींसाठी विशेष कायदा करण्यात यावा, यासाठी प्रयत्न केले. अखेर लक्ष्मीला न्याय मिळाला आणि मार्च २०१३मध्ये केंद्र सरकारने याबाबत कायदा केला. 

मेघना गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना वडील गेले, त्यात भाऊ छातीच्या असाध्य अशा आजाराने अंथरुणावर अशा परिस्थितीत लक्ष्मीने घर सांभाळत नेटाने हा लढा दिला. तिची हीच ह्रदयद्रावक कहानी छपाक या चित्रपटातून पाहता येणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोनने लक्ष्मीची भूमिका साकारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search