Next
आर्थर मॅकन
BOI
Saturday, March 03 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘एव्हरी ब्रांच ऑफ ह्युमन नॉलेज, इफ ट्रेस्ड अपटू इट्स सोर्स अँड फायनल प्रिन्सिपल्स, व्हॅनिशेस इनटू मिस्टरी’ म्हणणारा आणि अतींद्रिय जगतात घडणाऱ्या भयकथांचा बादशहा आर्थर मॅकन याचा तीन मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
..... 
तीन मार्च १८६३ रोजी मॉनमथशरमध्ये जन्मलेला आर्थर मॅकन हा १८९०च्या दशकातला श्रेष्ठ अतींद्रियकथा आणि भयकथांचा लेखक म्हणून प्रसिद्ध होता. 

त्याची १८९४ सालची ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा ही आदर्श भयकथा म्हणून नावाजली गेली आणि स्टीफन किंगसारख्या मातब्बर लेखकाच्या मते तर, ती इंग्लिश भाषेतली सर्वोत्तम भयकथा ठरावी! ‘द थ्री इम्पोस्टर्स’ आणि ‘द हिल ऑफ ड्रीम्स’ या त्याच्या कादंबऱ्या तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. 

मॅकनच्या अघोरी शक्तींच्या कथा आणि अतींद्रिय जगताच्या कथांवर अनेक लेखकांचा पिंड पोसला गेलाय, ज्यात क्लाइव्ह बारकर, स्टीफन किंग, लव्हक्राफ्ट, अॅलन मूर, नील गायमन यांसारख्यांचा समावेश होतो.

दी व्हाइट पीपल, दी हाउस ऑफ दी हिडन लाइट, दी सिक्रेट ग्लोरी, दी टेरर, दी ग्रीन राउंड, दी शायनिंग पिरॅमिड, दी कोझी रूम, एल्युसिनिआ, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१५ डिसेंबर १९४७ रोजी त्याचा बिकन्सफिल्डमध्ये मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link