Next
शहाणपणाच्या १०० गोष्टी
BOI
Thursday, July 18, 2019 | 10:37 AM
15 0 0
Share this article:

प्रतिकूल परिस्थितीत आशावादी दृष्टीकोन ठेवून आणि जगाकडे डोळे उघडे ठेवून पाहिल्यास अंगी चौकसपण येऊन धैर्य, धाडस, आत्मविश्वास अशा अनेक गुणांना आपलेसे करता येते. उद्योग क्षेत्रात नोकरीचा श्रीगणेशा करून शैक्षणिक क्षेत्रात मुक्तहस्ते ज्ञानदान करणाऱ्या प्रा. डॉ. स्मिता लेले यांनी ‘शहाणपणाच्या १०० गोष्टी’तून आशावाद, यशस्वी आणि सुखी होण्याचा संदेश दिला आहे.

आत्मवृत्तीला स्पर्श करत यातून शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. लहानपणापासून कुटुंबातील सदस्य, कौटुंबिक स्थिती यातून ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या आणि शिक्षण घेतानाचे अनुभव यातील काही लेखांत आहेत. लेखिकेने विविध विषयांवर केलेले लिखाण, कथांचाही पुस्तकात समावेश आहे. एकलव्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी मार्गदर्शनपर लेख असून, त्यात अनेक बोधकथा, उदाहरणे दिली आहेत. गणित, रसायन आदी, करिअर प्लॅनिंग, अध्यात्म या विषयांवरील लेखन असून, काही लेख इंग्रजीतून आहेत.

पुस्तक : शहाणपणाच्या १०० गोष्टी
लेखक : डॉ. स्मिता लेले
प्रकाशक : स्मिता लेले
पाने : १८८
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search