Next
‘ई-पेलेटर’चा ‘आयडीएफसी बँके’सह सहयोग
प्रेस रिलीज
Friday, May 25 | 02:33 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ई-पेलेटर ही नाविन्यपूर्ण डिजिटल क्रेडीट सोल्यूशन्स देणारी कंपनी आयडीएफसी बँकेसोबतच्या सहयोगाने भीम युपीआयचा वापर करत ऑनलाइन व ऑफलाइन व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी त्वरित डिजिटल क्रेडीट सेवा सादर करणार आहे. ई-पेलेटरची ‘बाय नाउ, पे लेटर’ क्रेडीट सेवा क्रेडीट कार्डप्रमाणे काम करते. ही सेवा पेमेंटसाठी लागणाऱ्या दीर्घकालीन प्रक्रियेचा त्रास दूर करते.

पहिल्यांदाच इंटर-बँक व्यवहारांची सुविधा देणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेल्या भीम युपीआय रेलरोड या तात्काळ रिअल-टाइम पेमेंट सिस्टमचा वापर करत डिजिटल क्रेडीट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यक्ती, व्यापारी व लघु व्यवसाय आता त्यांच्या खरेदीसाठी पेमेंटच्या इतर प्रीपेड मोड्स व्यतिरिक्त भीम युपीआयचा वापर करत रिअल-टाइम क्रेडीट सेवेचा लाभ घेऊ शकतात.

ई-पेलेटरची ‘बाय नाऊ, पे लेटर’ सेवा युजर्सना थकबाकी बिले भरण्यासाठी खरेदीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या बिनव्याजी कालावधीसह क्रेडीट व व्यवहाराची सुविधा देते. ही अत्यंत सुलभ सेवा आहे. युजर्सना व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही. ही सेवा खरेदीची पद्धत, डिजिटल उपस्थिती, सोशल मिडीया माहिती व डिवाइस माहिती अशा डेटाचा वापर करत रिअल-टाइम क्रेडीट मूल्यनिर्धारणासाठी प्रगत मशिन लर्निंग तंत्रांचा वापर करते. युजरला रिअल-टाइममध्ये क्रेडीट लिमिटची माहिती दिली जाते. या माहितीचा उपयोग करत ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्समध्ये उत्पादने व सेवांसाठी पेमेंट करता येऊ शकते.

ई-पेलेटरचे सह-संस्थापक ऑर्को भट्टाचार्य म्हणाले, ‘आपल्या देशामध्ये क्रेडीट कार्ड्सचा वापर खूपच कमी आहे. पण आता ३२० दशलक्ष स्मार्टफोन युजर्स आणि युपीआय डिजिटल पेमेंट्सच्या रूपातील सरकारी उपक्रमांमुळे क्रेडीट कार्ड्सच्या वापराला चालना मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही युपीआयच्या व्यापक नेटवर्कचा वापर करत सामान्य माणसांना क्रेडीट कार्डची सुविधा देण्याच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे लाखो व्यक्तींच्या हातात क्रेडीट कार्ड्स असतील आणि भौतिक कार्ड किंवा अर्जाच्या दीर्घकालीन प्रक्रियेचा त्रास दूर होईल. आम्हाला अशाप्रकाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देत असलेल्या ‘आयडीएफसी’सारख्या विकसित होणाऱ्या बँकेसोबत सहयोग जोडताना खूप आनंद होत आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link