Next
पाटील वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्यान
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this story

व्याख्यान देताना डॉ. राजेंद्र शितोळे. शेजारी स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे, अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भवाळकर, विश्वस्त डॉ. यशराज पाटील, शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सला स्वामी, प्राध्यापिका डॉ. मीनल पटवेकर.

पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायल आणि संशोधन केंद्रात स्त्री रोग व प्रसूती विभागातर्फे सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण या उपक्रमांतर्गत ‘आपत्कालीन समयी प्रसूतीबाबत येणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापन’ या विषयी व्याख्यान झाले.

गर्भावस्थेत प्रसूतीदरम्यान माता व बालक यांचे आरोग्यहित साधण्यासाठी विविध व्याधीचे निदान व केले जाणारे उपचार, तसेच सेवासुविधा याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या घटकास मार्गदर्शन व जागरूक करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तक्षय, एक्लॅम्पसिया, रक्तदाब, प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव याबाबत थोडक्यात माहिती आणि गर्भावस्थेत माता व बालक यांचे आरोग्यहित कसे साधता येईल याबद्दल मार्गदर्शन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे यांनी केले.

मार्गदर्शन करताना स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे.गरोदर स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अनिमिया) मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याची कारणे, प्रकार, होणाऱ्या व्याधी या दूर करण्यासाठी आवश्यक आहार, औषधे आणि योग्य उपचार याबाबत डॉ संजय पोंदे यांनी मार्गदर्शन केले. गर्भावस्थेच्या शेवटच्या अवस्थेत (एक्लॅम्पसिया) होणारा रोग, विषबाधा टाळण्यासाठी करण्यात येणारे उपचार याविषयी डॉ. उमेश साबळे यांनी व्याख्यान दिले. गर्भधारणेतील उच्चरक्तदाब त्यासाठी घ्यावयाची काळजी, करावयाच्या तपासण्या आणि उपचार याविषयी डॉ. राजेंद्र शितोळे यांनी व्याख्यान दिले. प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव या विषयावर डॉ प्रशांत सूर्यराव व डॉ. मीनल पटवेकर यांनी मार्गदर्शन केले. भारत विकास ग्रुपचे डॉ. शेळके यांनी बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून आरोग्यासाठी कार्यरत असणाऱ्या सेवांची माहिती तसेच आपत्कालीन समयी रुग्णापर्यंत ते रूग्णालयापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची आणि व्यवस्थापन यांची माहिती दिली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. चव्हाण, शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सला स्वामी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप माने, स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशपांडे यांसह डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील, जिल्हा आरोग्य विभागातील तसेच बीव्हीजी ग्रुपमधील  वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

‘गर्भवती माता व बालकाच्या आरोग्यहितार्थ आरोग्यदूत म्हणून आपण सर्व कटिबद्ध आहोत,’ असे सांगतानाच अधिष्ठाता डॉ. भवाळकर म्हणाले यांनी आपत्कालीन समयी प्रसूतीबाबत रुग्णालयातील सेवा सुविधा, योग्य उपचार व व्यवस्थापन याची माहिती त्यांनी दिली. पुणे भागातील खेड, हवेली, जुन्नर, आंबेगाव, मावळ, शिरूर येथील रुग्णांसाठी डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय वरदान ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link