Next
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रोपळे गावात मिरवणूक
BOI
Monday, September 23, 2019 | 05:40 PM
15 1 0
Share this article:



सोलापूर :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती २२ सप्टेंबर रोजी रोपळे (ता.पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणुकीसाठी कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे यांनी हत्तीची प्रतिकृती साकारली होती. या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध खेळ सादर केले आणि नेत्रदीपक मानवी मनोरेही साकारले.



या वेळी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी सरपंच दिनकर कदम, जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विनायक निंबाळकर, अर्जुन भोसले, बाळासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 



मिरवणुकीतील कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन कलाशिक्षक कल्लेश्वर पानसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात विद्यालयातून मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या प्रतिमेला अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळांची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. 



झांज, लाठी-काठी व लेझीम सादर करण्यात आले. सामाजिक संदेश देणारे मानवी मनोरे, टिपरी नृत्य व वारकरी दिंडीचाही यात सहभाग होता. मुलींनी सादर केलेल्या लेझीम सादरीकरणाने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मुलांना गोड खाऊचे वाटप करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक बिभीषण पाटील व पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली फटे, कल्लेश्वर पानसांडे, संतोष रोकडे, नितीन वाघमारे, अप्पासाहेब कंदले, नूतन समर्थ, संजय मोरे, रवींद्र क्षीरसागर,  प्रदीप कापसे, पांडुरंग सोनेवाड, विलास वाडेकर, तानाजी ननवरे, शुभांगी राऊत, महादेवी लंकेश्वरी, राजकुमार व्यवहारे, चंद्रकांत मलपे, सोमनाथ जगताप, शुभांगी राऊत, अंकुश भोसले, विद्या शिंदे, मोहन गिरी आदी रयत सेवकांनी प्रयत्न केले.

(मिरवणुकीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Mali a About 23 Days ago
Mast.. Khup Chhan
0
0

Select Language
Share Link
 
Search