Next
‘रानभाज्या जतनाची लोकचळवळ व्हावी’
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 05:35 PM
15 0 0
Share this story

रानभाज्यांविषयी मार्गदर्शन करताना प्रा. प्र. के. घाणेकरपुणे : ‘अधिक पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या तर हे पॊष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका असल्याने रानभाज्यांचा  प्रसार, प्रचार करताना काळजी घ्यावी; तसेच शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची लोकचळवळ व्हावी,’ अशी अपेक्षा प्रा. प्र. के. घाणेकर यांनी गुरुवारी (ता. २१) व्यक्त केली.  

जीविधा संस्थेच्या हिरवाई महोत्सवास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी ‘रानभाज्या : रानातून पानात’ या विषयावर ते बोलत होते. हा महोत्सव इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सुरू झाला. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे.

प्रा. घाणेकर म्हणाले, ‘जगात तीन लाख वनस्पती आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतो. यांपैकी ३०० वनस्पती खाद्य म्हणून वापरता येतात आणि तीसच वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हल्ली रानभाज्यांकडे सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वी रानभाज्या गाव-वस्तीच्या जवळ आढळत असत. आता त्या मिळविण्यासाठी लांब डोंगरात जावे लागते. रानभाज्या या अधिक पर्यावरणस्नेही आहेत, अधिक सेंद्रिय आहेत. त्यामुळे शहरवासीयांचे त्याकडे लक्ष गेले आहे. या रानभाज्या शहरात मिळाव्यात यासाठी त्यांचे काही वाण परसबागेत, शेतात लावता येतील का, हे पहिले पाहिजे.’

हिरवाई महोत्सवाला उपस्थित नागरिक‘एकीकडे आपण लागवड करीत असलेल्या गोष्टींचे पोषण मूल्य कमी होत चालले आहे. दुसरीकडे रानभाज्या खाण्याची उत्सुकता वाढली आहे. रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात, कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी-गिरीवासी लोकांना आहे. हे ज्ञान आणि हा खाद्यवारसा जपला पाहिजे. या खाद्यवारशाचे शास्त्रीय मार्गाने दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) झाले पाहिजे,’ असे प्रा. घाणेकर यांनी नमूद केले.

‘अधिक पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या, तर हे पौष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका असल्याने रानभाज्यांची प्रसार, प्रचार करताना काळजी घ्यावी; तसेच शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची  लोकचळवळ व्हावी,’ असेही त्यांनी सांगितले.

विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. राजीव पंडित यांनी महोत्सवाची माहिती दिली. या वेळी डॉ. वृंदा कार्येकर यांनी रानभाज्या व्हॉट्सअॅप ग्रुपची माहिती दिली. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी (२२ जून) सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. विनया घाटे, प्रीती कोरे, आडकर यांच्या ‘सातारा जिल्ह्यातील देवराया’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी प्रधान वन संरक्षक जीत सिंग उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर ‘गड आणि वनस्पती संवर्धन’ या विषयावर डॉ. राहुल मुंगीकर यांचे व्याख्यान होणार आहे.

२३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. हेमा साने यांचे ‘शाश्वत विकास’ या विषयावर व्याख्यान, तसेच या विषयावरील त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. त्यानंतर देवराई ट्रस्टतर्फे देशी वनस्पतींच्या रोपांचे वाटप केले जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kale Dinesh r About 144 Days ago
Plz add me, 9225664664
0
0

Select Language
Share Link