Next
जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे
BOI
Wednesday, February 27, 2019 | 10:18 AM
15 0 0
Share this story

‘ऐकावे जनाचे, पण करावे मनाचे’ ही म्हण बहुतेकांना परिचित असते. आपल्या सुप्त मनाची इच्छा ओळखल्यास हे शक्य होते. यासाठी ‘मज्जाभाषिक आज्ञा प्रणाली’ची (न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग- एनएलपी) पद्धती उपयोगी पडते, असा दावा ग्रुप कॅप्टन दी. प्र. आपटे (निवृत्त) यांनी केला असून, ‘जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे’ या पुस्तकातून त्याची माहिती दिली आहे.

‘एनएलपी’ ही मज्जातंतूच्या आज्ञावली लिहिण्याची एक प्रक्रिया आहे, असे सांगत या संकल्पनेमागील इतिहास, तिचे कार्य, ‘एनएलपी’चा अभ्यास कसा करावा, ‘एनएलपी’च्या इतिहासातील चढ-उतार, ‘एनएलपी’च्या मुलभूत संकल्पना, मुलभूत तत्व, गृहीतकांची माहिती दिली आहे. विश्वासप्रणाली, ‘एनएलपी’ची तंत्रे समजावून देत ‘एनएलपी’मधील सुप्त मनाचे प्रयोगही दिले आहेत. स्व- प्रयत्नांनी आपल्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग यातून सापडू शकतो, असे लेखकाचे म्हणणे आहे.

पुस्तक :
जागवा सामर्थ्य सुप्त मनाचे
लेखक : डी. पी. आपटे
प्रकाशक :
विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : ३८० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link