Next
‘लॉरिअल’ची ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 05:45 PM
15 0 0
Share this storyमुंबई : लॉरिअल इंडियाने एकूण खर्चाचे कार्यक्षमपणे व्यवस्थापन करण्यावर भर देणारे व जीएसटी लागू झाल्यानंतरचे पुरवठा साखळी एकत्रीकरणाचे धोरण राबवण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या थ्रीपीएल सोल्यूशन देणाऱ्या भारतातील एका सर्वात मोठ्या कंपनीशी भागीदारी केली आहे.

‘लॉरिअल’ ही जगातील सर्वात मोठी कॉस्मेस्टिक्स कंपनी आहे आणि हेअर कलर, स्किन केअर, सन प्रोटेक्शन, मेक-अप, परफ्युम व हेअर केअर यावर लक्ष केंद्रित करून कंपनीने या क्षेत्रात उपक्रम विकसित केले आहेत. याचा भाग म्हणून, हरियाणातील वितरण केंद्राचे ‘लॉरिअल’चे दक्षिण आशियाचे ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष पंकज गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी यांनी सांगितले, ‘हा करार म्हणजे, आमचे झोकून देऊन काम करणे व ग्राहकांप्रति सेवा-प्रणित दृष्टिकोन ठेवणे, यांची पावती आहे. या भागीदारीमुळे एफएमसीजी, कॉस्मेटिक्स क्षेत्रातील आमच्या उत्पादन-सेवा अधिक सक्षम होणार आहेत. आमचा ग्राहक म्हणून ‘लॉरिअल’सारख्या आघाडीच्या ब्युटी कंपनीचे स्वागत आहे. आमच्या तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक्स सुविधांमुळे लॉरिअलला निश्चितच फायदा होईल व त्यांना खर्चामध्ये अपेक्षित असलेली किफायतशीरता साध्य करण्यासाठी मदत होईल.’

लॉरिअल इंडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर अलोक ओक म्हणाले, ‘भारत ही जगातील एक झपाट्याने वाढणारी ब्युटी बाजारपेठ आहे आणि येथील आमच्या कार्यामध्ये आम्ही गुंतवणूक करणार आहोत. विविध बिझनेस चॅनलना किफायतशीर पद्धतीने, कार्यक्षम व वेळेवर कामाची पूर्तता करण्याच्या बाबतीत वेगळेपण ठसवण्यासाठी लॉजिस्टिक्सची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. हरियाणातील तौरू रोड येथील वितरण केंद्र आमच्या नेटवर्क एकत्रीकरणाचा एक भाग आहे. वितरकांसह लॉरिअलचे ग्राहक व यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तसेच नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर), पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानचा काही भाग येथे विशिष्ट उत्पादनांच्या आधुनिक व्यापारासाठी त्याचे डिझाइन केले आहे.’   

‘लॉरिअल इंडिया’विषयी :
लॉरिअल इंडिया भारतात सन १९९४पासून लॉरिअल एसएची संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून कार्यरत आहे. आज लॉरिअल इंडिया १४ ब्रँडसह सर्व वितरण चॅनलमध्ये उपलब्ध आहे. मास मार्केट चॅनेल्समध्ये (लॉरिअल पॅरिस, गार्निअर, मेबलाइन न्यूयॉर्क, एनवायएक्स प्रोफेशनल मेकअप) आहे. हेअर व ब्युटी सलॉनमध्ये (लॉरिअल प्रोफेशनल, मॅट्रिक्स, केरास्टेस, चेरलीज कॉस्मेक्युटिकल्स, डिक्लेऑर) उपलब्ध आहे. निवडक वितरणामध्ये (केल्स, युस सेंट लॉरेंट, जॉर्जिओ अरमानी, रॅप्ल लॉरेन, डिझेल) उपलब्ध आहे.

लॉरिअल इंडियाचे चाकण (पुणे) व बद्दी (हिमाचल प्रदेश) हे दोन उत्पादन प्रकल्प, संशोधन व विकास प्रकल्प आणि मुंबईतील मुख्यालय यासह चार प्रादेशिक कार्यालयांमध्ये एकूण एक हजार ६०० कर्मचारी आहेत.

‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’विषयी :
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ही १९ अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाच्या एक अब्ज डॉलर प्रायव्हेट इक्विटी असलेल्या महिंद्रा पार्टनर्सची पोर्टफोलिओ कंपनी आहे. ‘एमएलएल’ ही सप्लाय चेन मॅनेजमेंट व पीपल ट्रान्सपोर्ट सोल्यूशन यामध्ये हातखंडा असलेली एकात्मिक थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सेवा देणारी कंपनी आहे. दशकभरापूर्वी स्थापना झालेली एमएलएल ऑटोमोबाइल, इंजिनीअरिंग, कन्झ्युमर गुड्स व ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांतील ३०० हून अधिक कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते. कंपनी ‘अॅसेट-लाइट’ बिझनेस मॉडेल अवलंबते व संपूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंट व पीपल ट्रान्सपोर्ट सोल्यूशनसंबंधी कस्टमाइज्ड व तंत्रज्ञानावर आधारित सेवा देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link