Next
सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन
BOI
Friday, September 13, 2019 | 03:34 PM
15 0 0
Share this article:

सिंहगड पोलिस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. या वेळी खा. गिरीश बापट, माधुरी मिसाळ, श्रीकांत तरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे :  ‘देशपातळीवर देण्यात येणारा स्मार्ट पोलिस ठाणे हा पुरस्कार अद्याप पुण्याला मिळाला नाही. तो येत्या काळात सिंहगड पोलिस ठाण्याच्या रूपाने मिळेल. सिंहगड रस्ता परिसरात स्मार्ट पोलिस ठाण्याची गरज होती,’ असे मत पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले. भाजप पुणे शहराध्यक्षा आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्या निधीतून सिंहगड पोलिस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत  होते. 

या वेळी खासदार गिरीश बापट, आमदार मिसाळ, अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे, पौर्णिमा गायकवाड, नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, अनिता कदम, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, आनंद रिठे, महेश लडकत, हरिश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे महापालिकेचे अधिक्षक अभियंता शिवाजी लंके, शाखा अभियंता भास्कर हांडे, पाटबंधारे खात्याचे अधिकारी चौगुले आदी उपस्थित होते.

या वेळी सिंहगड पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि विविध विकासकामे, पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम आणि पर्वती देवस्थान सुशोभिकरणासाठीच्या अडीच कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘नागरिकांच्या सोयीसाठी विविध कामे करण्यात येणार आहेत. परिसरातील वाहतुकीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लवकरच सोडवू,’ असे आश्वासन आमदार माधुरी मिसाळ यांनी दिले. पोलिस ठाण्यासाठी गोसावी परिवारांच्या माध्यमातून जागा देण्यात आली असून, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


‘कार्यक्षम आमदारांमुळे परिसरातील कामे सुनियोजित होत असून, परिसरात रस्त्यांचीदेखील कामे होऊन नागरिकांना वाहतूक सुखकर होईल,’ असे खासदार बापट यांनी सांगितले.

सोळा हजार चौरस फूटाच्या इमारतीत आधुनिक पोलिस ठाणे उभारण्यात येणार असून, पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत पोलिस ठाण्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search