Next
आयुर्वेद महाविद्यालयात योग दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, June 23 | 11:33 AM
15 0 0
Share this story

पिंपरी : चौथ्या जागतिक योग दिनानिमित्त येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रात  १४ ते २१ जून २०१८ या कालावधीत योग सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

विविध आजारांवर योगविषयक मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिर घेण्यात आले; तसेच आंतर रुग्ण विभागातील रुग्णांसाठी योग सप्ताह कालावधीत मोफत योगाभ्यास वर्ग घेण्यात आला. सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धा, योगविषयक निबंध स्पर्धा, योगविषयक पोस्टर स्पर्धा, योग जनजागृती फेरी, ध्यान धारणाविषयक (मेडिटेशन) व्याख्यान झाले. २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत योगाभ्यास वर्ग घेण्यात आला. या वर्गात विविध योगसने, प्राणायाम करण्यात आले. त्याचप्रमाणे योग सप्ताहात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. एन. राजदान, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भवाळकर, शैक्षणिक विभागाचे संचालक डॉ. एन. जे. पवार, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र शर्मा यांसह विद्यार्थी, रुग्ण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विवेक कोलते यांनी योगसाधनेचे प्रात्यक्षिक केले.

डॉ. संतोष कांबळे, डॉ. योगेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी भारती मराठे यांनी योग सप्ताहानिमित्त घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link