Next
आबेदा इनामदार सीनिअर कॉलेजला ‘नॅक’चे प्रमाणपत्र
प्रेस रिलीज
Friday, September 28 | 04:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार सिनियर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्सला नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिशनतर्फे (नॅक, बंगळुरू) प्रमाणपत्र आणि ‘ए’ श्रेणी देण्यात आली. 

‘३०व्या मान्यताप्राप्त स्थायी समितीने तीन जुलै २०१८ रोजी संस्थेला भेट देऊन पाहणी, तपासणी केली होती. अभ्यासक्रम, शिक्षण आणि मूल्यांकन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, विद्यार्थी आणि प्रगती, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य या निकषांच्या आधारे हे अ‍ॅक्रिडिटेशन देण्यात आले आहे,’ अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी दिली.

या मूल्यांकनाबद्दल एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बुटवाला यांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link