Next
वेध ‘स्व’चा
BOI
Tuesday, January 22, 2019 | 10:06 AM
15 0 0
Share this story

अनेकदा प्रत्येकाला वेगळे काहीतरी करायचे असते; पण हे वेगळे काय हे ठरविताना स्वत:चा शोध आधी घेतला की पुढील वाट सुकर होते. त्यात कितीही अडथळे आले तरी ते पार करण्याची हिंमत येते, असे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न ‘वेध ‘स्व’चा’मधून भुजंगराव शेळके यांनी केला आहे.

माणूस म्हणून जगण्यासाठी काय करावे, करियर व समाधानाची सांगड, नोकरीबद्दलची वास्तविकता जाणून घेणे श्रेयस्कर कसे असते, हे त्यांनी सांगितले आहे. वेगळी वाट निवडण्याची वेळ, यासाठी सर्वांच्या मान्यतेबरोबरच स्वत:च्या अंत:करणाचा विचार करणे, स्वत:चे कौशल्य इतरांपुढे मांडणे, स्वतःच्या सामर्थ्याचा विचार करून पुढची वाटचाल करताना ध्येयासाठी जगणे, तसे जगण्याचे फायदे यातून समजतात. स्वत: मधील कौशल्याचा शोध घेण्यासाठी चार मुद्दे यात आहेत. यशाची व्याख्या कशी ठरवावी हे सांगताना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली आहे. यात शिव नाडर, डॉ. सुभाष चंद्रा, जीओनी रोलिंग, किरण मजुमदार शॉ यांसारखे प्रथितयश आहे. त्यांच्यापासून आपण कोणती शिकवण घ्यावी, हेही नमूद केले आहे.

स्वतःची स्वप्ने, स्वतःच्या कल्पना जाणून आयुष्य खरेच परिपूर्णतेने, आनंदाने जगण्याची तसेच आयुष्यात काहीतरी महत्त्वपूर्ण कमविण्याची, मिळविण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे. आपण अगदी लहानपणापासून स्पर्धेच्या वातावरणात राहतोय, किंबहुना या स्पर्धेलाच आपली संस्कुती मानतोय. त्यामुळे काही वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धेमुळे मनामध्ये एक रितेपणा निर्माण होत आहे. ‘कराव्या लागतात म्हणून काही गोष्टी करतोय,’ ही मानसिकता वाढते. असा जगण्यातला अर्थ कमी होत आहे.

जगण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत उद्देश शोधण्याच्या आपल्या क्षमतेची जाणीव व्हावी व त्यासाठी आपण अंतरंगातील होकायंत्राशी मैत्री कशी करायची ते या पुस्तकातून तुम्हाला समजेल. स्वतःमध्ये कोणते सुप्तगुण आहेत, ते कसे विकसित करायचे, स्वतःच्या आयुष्याचे ध्येय तरी काय आहे, या अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून मिळतील.

पुस्तक : वेध ‘स्व’चा
लेखक : भुजंगराव शेळके
प्रकाशक : अभिज्ञ पब्लिकेशन
पाने : १९२
किंमत : २३० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link