Next
पोस्ट कार्यालयांत सेट-टॉप बॉक्सची प्रारंभिक नोंदणी
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 02:08 PM
15 0 0
Share this story

मुंबई : १३० कोटी भारतीयांना प्रभावीपणे शून्य किंमतीत मनोरंजन पुरविण्याच्या आपल्या अनोख्या सुविधेनंतर रिलायन्स बिग टीव्हीने महाराष्ट्र आणि गोव्यातील १२ हजार भारतीय पोस्ट कार्यालयांसह भागीदारी केली आहे. या अंतर्गत उपभोक्ते पोस्ट कार्यालयांमध्ये ५०० रुपये भरून एचडी डीटीएच सेट-टॉप बॉक्सेसची प्रारंभिक नोंदणी करू शकणार आहेत.

आपल्या ग्राहकांना पूर्ण सपोर्ट करण्यासाठी आणि मनोरंजन, चित्रपट, क्रीडा, बातम्या, इन्फोटेनमेंट, शिक्षण, मुलांसाठी साहित्य व इतर गोष्टी अधिक दर्जेदार करण्यासाठी रिलायन्स बिग टीव्ही आपले नेटवर्क समस्त भारतात आणखी विस्तारीत करत आहे. त्यांचे अलिकडचे एचडी एचइव्हीसी डिव्हाइस अधिक दर्जेदार डिजिटल अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

रिलायन्स बिग टीव्हीचे संचालक विजेंदर सिंह म्हणाले, ‘आपल्या या अलीकडच्या ऑफरने रिलायन्स बिग टीव्हीने भारतातील डिजिटल मनोरंजनाची परिभाषा पूर्णतः बदलली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील १२ हजार भारतीय पोस्ट कार्यालयांसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतीय टपाल खाते देशाच्या कान्या-कोपऱ्यांत पोहोचले आहे, जे इतर कोणत्याही लॉजिस्टिक विभागाला शक्य नाही. या क्षमतेमुळेच उपभोक्ते महाराष्ट्र आणि गोव्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसात ५०० रुपये भरून या ऑफरचा लाभ घेऊ शकतील.’

आता प्रत्येक भारतीय घरात त्यांच्या सेवेत प्रभावीरित्या मोफत आणि उच्च गुणवत्तेचे मनोरंजन उपलब्ध होऊ शकेल आणि प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्याला आमच्या एचडी एचइव्हीसी सेट-टॉप बॉक्सबरोबर, जे भारतीय पोस्ट ऑफिस मधून आरक्षित करता येणार आहे, अभ्यासाचा मजकूर देखील भेट म्हणून मिळेल. रिलायन्स बिग टीव्हीच्या एचडी एचइव्हीसी सेट-टॉप बॉक्समध्ये शेड्यूल रेकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, यूट्यूब, रेकॉर्डिंग आणि एकाच वेळी चॅनल पाहता येण्याची सोय आदी. आधुनिक वैशिष्ट्ये आहेत.

नुकत्याच जाहीर केलेल्या ऑफरप्रमाणे रिलायन्स बिग टीव्ही एचडी चॅनल्ससह अनेक पे चॅनल्स एक वर्षासाठी आणि सुमारे ५०० एफटीए चॅनल्स पाच वर्षांसाठी संपूर्ण मोफत देणार आहे; तसेच युनिफाईड ग्राहक ऑफरसह मनोरंजन आणि शिक्षणाच्या बाबतीत शहरी आणि ग्रामीण ग्राहकांना एका मंचावर आणून डिजिटल इंडिया उपक्रमास मदतरूप होत असल्याचा दावा संचालकांनी केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link