Next
नवनाथ रणखांबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
मिलिंद जाधव
Tuesday, March 19, 2019 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

कल्याण : ‘प्रीतीगंध फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय सामाजिक कार्य पुरस्कार या वर्षी नवनाथ रणखांबे यांना जाहीर झाला असून, त्याचे वितरण २४ मार्च २०१९ रोजी सायन येथील निसर्ग उद्यान येथे शिवानी साहित्य मंचातर्फे आयोजित काव्य संमेलनात केले जाणार आहे,’ अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष म्हाडेश्वर यांनी दिली.  

रणखांबे तासगाव तालुक्यातील (जि. सांगली) गौरगाव या खेडेगावातील असून, ते कल्याण येथे वास्तव्यास आहेत. ठाणे-मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे. रणखांबे हे सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, साहित्य, कामगार संघटन आदी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. शोषित, पिडीत, वंचितांच्या मुलांना ज्ञानदान करण्याचे काम त्यांनी केले आहे. शाळा, शासकीय प्रकल्प, क्लास आदींमध्ये त्यांनी अध्यापन केले आहे. दामोदर विशेआदिवासी (कातकरी) मुलींचे शैक्षणिक संकुल चांग्याचा पाडा येथे ते शिक्षण तज्ज्ञ, शालेय व्यवस्थापन कमिटीवर सदस्य म्हणून काम करीत आहेत. गरजू आणि गरिबांना ते मोफत कायदेशीर सल्ला देतात.

वाचन संस्कृती वाढावी म्हणून घरगुती फिरते वाचनालय चालवून मित्र परिवारात आणि गरजूंना पुस्तके उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. शाळा-महाविद्यालयांतील मुलांना ते शैक्षणिक मार्गदर्शनही करतात. त्यांनी अनेक कवी संमेलनाचे आयोजन केले असून, कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम केले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि थोर महान पुरुष  यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रात करीत आहे.

कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबईचे अध्यक्ष या नात्याने  त्यांनी आजपर्यत समाजातील ४० गुणवंत लोकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. कवी संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात ते जेष्ठ आणि नवोदित कवींना विचारमंच उपलब्ध करून देण्याचा आणि मानवतावादी कवी घडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. आर. ए. फेडरेशन या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी झटणाऱ्या संघटनेचे ठाणे जिल्हा पदाधिकारी म्हणून ते गेली १३ वर्षे काम करत आहेत. यापूर्वीही त्यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब कृतज्ञता पुरस्कार, छ. शिवाजी महाराज पुरस्कार, काव्य लेखन पुरस्कार, अक्षर भूषण पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

मास्टर राजरत्न राजगुरू, साहित्यिक जगदेव भटू, साहित्यिक विजयकुमार भोईर, कवी दीप, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, एम. डी. कांबळे, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, अॅड प्रज्ञेश सोनावणे, कवी संघरत्न घगघाव, पत्रकार कवी मिलिंद जाधव आदींनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रणखांबे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Santosh mhadeshwar About 152 Days ago
Heartly congrats dear sir ...D
0
0

Select Language
Share Link
 
Search