Next
‘सीआरपीएफ’साठी ‘पेटीएम’ने जमा केले ४७ कोटी
BOI
Monday, March 18, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

‘पेटीएम’ने ‘सीआरपीएफ वाईव्हज वेलफेअर असोसिएशन’च्या अध्यक्ष मनू भटनागर यांना ४७ कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

मुंबई : ‘पेटीएम’ या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट्स कंपनीने ‘सीआरपीएफ (CRPF) वाईव्ह्ज वेलफेअर असोसिएशन’च्या अध्यक्ष मनू भटनागर यांना ४७ कोटी रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.‘सीआरपीएफ’च्या वीरांसाठी पेटीएम वापरकर्त्यांकडून देण्यात आलेल्या योगदानातून ही रक्कम जमा झाली होती. 

१४ फेब्रुवारी रोजी ‘सीआरपीएफ’ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर या मंचावरून निधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. १५ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान २० लाखांपेक्षा जास्त ‘पेटीएम’ वापरकर्त्यांनी पुढे होऊन लष्कराबद्दल वाटत असलेली आस्था व्यक्त करण्यासाठी आर्थिक योगदान दिले.

हा निधी जमा करण्यासाठी ‘पेटीएम’ने सीआरपीफ वाईव्ह्ज वेलफेअर असोसिएशनशी सहयोग केला होता. ८०जी अंतर्गत कर लाभ मिळवण्यासाठी दात्यांना फक्त आपले नाव आणि पॅनकार्ड नंबर दाखल करण्याची गरज होती. या अॅपच्या माध्यमातून केलेल्या सर्व देणग्यांवर प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले होते.
 
‘पेटीएम’चे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले, ‘या हल्ल्यामुळे ज्यांना अकल्पनीय नुकसान सोसावे लागले आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. या गरजेच्या काळात त्यांना मदतीचा हात देऊन आपल्या जवानांच्या परिवारांना मदत करण्यासाठी ‘पेटीएम’ वचनबद्ध आहे. या उदात्त कारणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search