Next
‘आर्ट पुणे’च्या वतीने ‘शून्य घर’ चित्रपटाचे स्क्रीनिंग
प्रेस रिलीज
Monday, October 23 | 07:01 PM
15 0 0
Share this story

 
पुणे : ‘गायन, वादन, नृत्य या कलांसाठी पुणे शहर हे जगात आपली ओळख बनवून आहे. मात्र असे असले तरी अद्यापही व्हिज्युअल आर्टसाठी या शहरात काही भरीव होताना दिसून येत नाही. या क्षेत्रात भरीव काम करायचे झाल्यास शहरातील कलाकार आणि कलाप्रेमींनी एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध कलाकार आणि कोची मुजरिस बिनालेचे माजी क्युरेटर सुदर्शन शेट्टी यांनी व्यक्त केले.
 
कलाकार आणि कलेविषयी आस्था असलेल्या समविचारी नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘आर्ट पुणे’ या संस्थेच्या वतीने शेट्टी यांच्या ‘शून्य घर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक डॉ. प्रकाश मगदूम यांबरोबर आर्ट पुणेचे राजू सुतार, वैशाली ओक, संजीव पवार, प्रियंवदा पवार, मंगेश लोहपात्रे, शोभना हडप, मेहुल शाह, विशाल कटारिया,
आदी या वेळी उपस्थित होते.
 
या वेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘कोची, चेन्नई या शहरांचा विचार केला तर या ठिकाणी शहरातील कलाकृती या त्या त्या ठिकाणच्या इतिहासातून आल्या आहेत. याबरोबरच बाहेरील गोष्टींचा प्रभावही यावर झालेला पहायला मिळतो. पुण्याचा विचार केला तर या शहराकडे स्वत:च्या अनेक गोष्टी आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या हे शहर पुढारलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिज्युअल आर्ट चा प्रसार होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे’.
 
‘शून्य घर’ हा चित्रपट १२ व्या शतकातील प्रसिद्ध कवी आणि संत गोरक्षनाथ यांच्या असून ‘शून्य गढ शहर, शहर घर बस्ती’ या दोह्यावर आधारित असून यामध्ये व्यक्तीचित्रांबरोबरच शिल्पे, संगीत यांसारख्या अनेकविध कलांच्या एकत्रीकरण करून अपेक्षित तो अर्थ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदर्शन शेट्टी हे स्वत: नावाजलेले कलाकार असून पेंटिंग, शिल्प, व्हिडिओ, इंस्टॉलेशन यांबरोबरच अनेक कलांमध्ये त्यांचा हातखंड आहे. राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांची आणि त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link