Next
नगरमध्ये ‘इंटीग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट इनिशीएटिव्ह’ प्रकल्प
‘टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट’चा पुढाकार
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर : टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट (टीपीसीडीटी) आणि नाबार्ड यांनी खांडके-सुपा विंड फार्म साइट येथे ‘इंटीग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यात आला असून, त्यामुळे येथील रांजणी गावात लवकरच पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे.

पुढील चार वर्षांत या प्रकल्पातून एक हजार १३४ हेक्टर्स जमीन व्यापली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील क्षमतेनुसार १०४.९ हेक्टर्स जमिनीवर काम केले जाईल. बॉस्को ग्रामीण विकास केंद्र (बीजीव्हीके) या उपक्रमातील अंमलबजावणी भागीदार आहेत. ‘बीजीव्हीके’ रांजणी गावातील व्हिलेज वॉटरशेड डेव्हलपमेंट कमिटीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणार आहे.

या विषयी बोलताना ‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘स्थानिक समुदायाला थेट कृती करून पाठबळ देणे हा ‘टाटा पॉवर’च्या शाश्वत तत्त्वांचा मूळ गाभा आहे. लक्षणीय विकासाचे परिणाम देणाऱ्या स्थानिक फार्म अर्थव्यवस्थेसाठी ‘नाबार्ड’च्या साह्याने हा उपक्रम राबवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि हा प्रकल्प यशस्वी होईल, अशी आम्हाला आशा आहे. आसपासच्या समाजातील रोजगार आणि पाणी सुरक्षा यासंदर्भात हा उपक्रम अत्यावशक अशी स्थिरता आणण्यात अत्यंत परिणामकारक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.’

२०१६मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘टीपीसीडीटी’च्या कामाने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देत एक हजार १८५ हेक्टर्स जमीन सुपिक केली आहे आणि एक हजार १२३ कुटुंबांना त्याचा लाभ झाला आहे. नगर तालुक्यातील रांजणी हे सर्वाधिक दुष्काळाचे गाव आहे. इथे गेल्या वर्षांत फक्त ५०० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळेच ‘वॉटरशेड’ कार्यक्रमासाठी हे गाव योग्य ठरले. ‘टीपीसीडीटी’च्या ‘वॉटरशेड’ उपक्रमाने अनेक गावांना लक्षणीय लाभ दिले आहेत आणि हे लाभ वृद्धिंगत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search