Next
भिवंडीत रंगले संविधान जनजागृती कविसंमेलन
‘माझी आई प्रतिष्ठान’चा उपक्रम
मिलिंद जाधव
Monday, November 26, 2018 | 04:01 PM
15 0 0
Share this storyभिवंडी : आपल्या कवितेतून संविधानाची जनजागृती व प्रसार व्हावा, संविधानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि नवीन कवींना विचारमंच उपलब्ध व्हावा या हेतूने तालुक्यातील माझी आई प्रतिष्ठानतर्फे ‘संविधान जनजागृती कविसंमेलन’ शहरातील सनोबर ट्रेनिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.

कविसंमेलनाचे उद्घाटन पत्रकार नीलम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड,  संमेलनाध्यक्ष साहित्यिक जगदेव भटू, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार भोईर, संस्थेच्या सचिव विजया भोईर उपस्थित होते. प्रारंभी कवी संघरत्न घनगाव आणि कवी नवनाथ रणखांबे यांनी प्रास्ताविक केले. ‘आंबेडकरवादी साहित्य, संस्कृती, विचार आणि प्रसार आम्ही कवी संमेलनाच्या माध्यमातून सतत करत आहोत. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे कार्य आम्ही जोमाने पुढे घेऊन जात आहोत,’ असे त्यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

फुले, शाहू आंबेडकर चळवळ ही कवींनी आपल्या साहित्यातून जपली असून, कवी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रबोधन करत असल्याचे अनिल गायकवाड यांनी सांगितले, तर ‘मी आज तुमच्यासमोर माझे विचार मांडू शकले व संपादिका होऊ शकले ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानामुळेच,’ असे पत्रकार चौधरी यांनी सांगितले.

‘कवितेतून संविधानाची जनजागृती हा स्तुत्य उपक्रम असून, जेष्ठ साहित्यिकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कवी घडत आहेत ही मोठी बाब आहे. चळवळीला कोण पुढे नेत असतील, तर ते कवी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार. रात्र-दिवस आम्ही एकच ध्यास घेऊन चाललो आहोत ते म्हणजे ‘धम्म’. आपण समाजाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देणे लागतो लागतो. डॉ. आंबेडकरांचे आम्हाला ऋण फेडायचे आहे,’ असे सांगत डॉ. सुनील भालेराव यांनी ‘संविधानातील नीतिमूल्ये’ ही कविता सादर केली. ‘तुमच्या संविधान जनजागृती कवी संमेलनाच्या प्रेरणेने माझ्यासारखा एक नवीन कवी आज जन्माला आला आहे,’ अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.‘शहरात अनेक संमेलन होत असतील, पण माझी आई प्रतिष्ठानतर्फे या संविधानाची जनजागृती करणारे हे पहिलेच कविसंमेलन असेल,’ असे संमेलनाध्यक्ष भटू यांनी बोलताना सांगितले.

‘प्रतिष्ठानतर्फे आम्ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन कवींना संधी उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहोत आणि यापुढेही करीत राहणार,’ असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार भोईर यांनी सांगितले.

विविध ठिकाणाहून आलेल्या ४० कवींनी संविधानावर स्वरचित दर्जेदार कविता या वेळी सादर केल्या. या वेळी  धम्मसूर्य साप्ताहिकाच्या संपादिका डॉ. उज्ज्वला सुनील भालेराव, ज्येष्ठ कवी आणि गायक अॅड. प्रज्ञेश सोनावणे, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, संदीप कांबळे, उदय क्षीरसागर, माधव गुरव, विष्णू खांजोडे, दीप चव्हाण आदी कवी, साहित्यिक, उपस्थित होते. सहभागी कवींना प्रतिष्ठानकडून  सन्मानचिन्ह देण्यात आले. कवी मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कवी मारुती कांबळे व कवी नरेश जाधव यांनी आभार मानले. संमेलनाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

(संविधान दिनानिमित्ताने विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link