Next
वडगाव बुद्रुक येथील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन
भाजी मंडईसह अन्य विकासकामांचेही उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, September 22, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पीएमपीएल’च्या वडगाव बुद्रुक येथील नव्या बसस्थानकाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते २० सप्टेंबरला झाले.

तेथील भाजी मंडई, सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा व अन्य विकासकामांचे उद्घाटनही बापट यांनी केले. महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, ‘पीएमपीएल’च्या अध्यक्षा नयना गुंडे, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नीता दांगट, राजश्री नवले, योगेश समेळ, खडकवासला भाजप मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, जयश्री भूमकर, बाळासाहेब जाधव, गुलाबनाना चरवड, संभाजीराजे दांगट, हेमंतदादा दांगट, पत्रकार विकास वाळुंजकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक असे या बसस्थानकाचे नामकरण करण्यात आले.  

नव्या प्रशस्त जागेत बसस्थानक सुरू झाल्याने वडगाव परिसरातील नागरिकांना शहराच्या सर्व भागांत जाण्यासाठी आता बसगाड्या उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री बापट म्हणाले, ‘मंडई, वाचनालय व व्यायामशाळा मोकळ्या व प्रशस्त जागेत आल्याने गावातील जुन्या चौकातील वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका झाली आहे. आरोग्य व संस्कार देणारे केंद्र येथे सुरू झाल्याने समाजाला त्याचा उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत.’

‘उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान योजना यांसारख्या योजनांतून गोरगरीबांना मदत होणार आहे. मुद्रासारख्या योजनेतून हजारो युवकांना व्यवसायाची संधी मिळाली आहे. समाजाची उन्नती करणे, वंचितांच्या विकासासाठी सतत काम करणे हे भाजपचे धोरण आहे. याची माहिती लोकप्रतिनिधींनी जनतेला दिली पाहिजे. वडगाव परिसरातील स्वच्छतेवर आता लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ‘पीएमपीएल’चे नवे बसस्थानक सुरू झाल्याने उपनगरात जाणे आता वडगावच्या नागरिकांना सोपे होणार आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी जिल्हा नियोजन मंडळातून विविध विकास कामांना या परिसरात गती मिळाली आहे.’या प्रसंगी नयना गुंडे, नगरसेवक हरिदास चरवड यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी वडगाव परिसरातील अमरज्योत मित्र मंडळ चौक ते पाउंजाई मंदिर चौक व भैरवनाथ मंदिर ते चरवडवाडी या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन भूमीपूजन बापट यांनी केले. रायगडनगर व विकासनगर परिसरात उतारावर पायऱ्या बसविणे, सीमाभिंत बांधणे आदी विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार तापकीर व अन्य मान्यवरांनी केले.

या प्रसंगी विकास कांबळे, श्रीकांत पवळे, बापू वाघमारे, बापू मकवाणे, शिवाजी आटोळे, मोहन गायकवाड, संग्राम पवार, समीर रायकर, कल्पेश ओसवाल, संदीप चरवड, यशवंत लायगुडे, युवराज जाधव, सचिन कडू, बाळासाहेब मनेरे, सचिन मनेरे, विशाल जाधव, दत्तात्रेय देशपांडे, अभिजित देशमुख उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link