Next
‘क्विक राइड’चे पुण्यात दोन लाखांहून अधिक ग्राहक
प्रेस रिलीज
Wednesday, July 03, 2019 | 01:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘क्विक राइड’ या भारतातील अग्रगण्य कार आणि बाइक-पूलिंग अॅप्लिकेशनने बेंगळूरू, मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि कोलकाता येथे २० लाख वापरकर्त्यांची यशस्वी नोंदणी झाल्याची घोषणा नुकतीच केली. २०१५मध्ये बेंगळूरूमध्ये आपली सेवा सुरू करणारी ही स्टार्टअप कंपनी भारतातील कारपूलिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी ठरली असून, एकूण २० लाख ग्राहकांपैकी दोन लाख ग्राहक एकट्या पुण्यातील असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

बेंगळूरू आणि चेन्नईनंतर ‘क्विक राइड’साठी पुणे हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर ठरले आहे. ‘क्विक राइड’ने पुण्यात जानेवारी २०१८पासून आतापर्यंत १० लाखांहून अधिक प्रवाशांना ‘कारपूलिंग’ची सेवा दिली असून, एकतीसशे टन कार्बनचे उत्सर्जन रोखले आहे. येथे ही सेवा सुरू केल्यापासून गेल्या दीड वर्षांत येथील वापरकर्त्यांच्या संख्येत २५ टक्के वाढ झाली आहे. सुमारे ३० हजार वापरकर्त्यांपैकी दररोज सात हजार जण ‘क्विक राइड’च्या कार-पूलिंग सेवेचा लाभ घेतात. त्यायोगे सात हजार गाड्यांना पुण्याच्या रस्त्यावर धावण्याची गरज भासत नाही. यातून दररोज २१ टन इतके कार्बन उत्सर्जन वाचते. 

पुण्यातील एकूण वापरकर्त्यांमध्ये ५७ टक्के महिला असल्याने त्यांना ‘क्विक राइड’ची सेवा सोयीची व भरवशाची वाटत असल्याचे या वरून सिद्ध झाले. त्याचप्रमाणे, ‘क्विक राइड’ने ‘गो-ग्रीन’ ही कारपूलिंग जागरूकता मोहीम हिंजवडी, मगरपट्टा सिटी, तळवडे या ठिकाणी असलेल्या विप्रो, कॉग्निझंट, केपजेमिनी, इन्फोसिस, आयबीएम, टेक महिंद्र, एम्फासिस, एचसीएल यांसारख्या ५० कंपन्यांमध्ये सुरू केली आहे.

फारच कमी कालावधीत पुणे ही ‘क्विक राइड’साठी भारतातील आणि महाराष्ट्रातील तिसरी सर्वांत मोठी बाजारपेठ बनली असून, मुंबईच्या तुलनेत येथील ग्राहकांची संख्या चौपट आहे. ‘क्विक राइड’च्या लोकप्रियतेची ही पावती आहे. प्रवासाचा वेळ कमी लागणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रदूषण कमी होणे यांप्रती ‘क्विक राइड’ प्रतिबद्ध असल्याचे दिसून यातून येते. ग्राहकांची संख्या वाढत असतानाही ‘क्विक राइड’ची कार पूलिंगची सेवा अत्यंत विश्वासार्ह राहिली आहे. 

‘शेअर्ड मोबिलिटी’ या क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्याची आपली आकांक्षा व्यक्त करताना ‘क्विक राइड’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केएनएम राव म्हणाले, ‘रस्त्यावर धावणाऱ्या खासगी वाहनांचा यथोचित वापर व्हावा आणि त्यायोगे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने आम्ही हा ‘कारपूलिंग’चा व्यवसाय सुरू केला. यापुढे रस्त्यावर कोणतीही नवीन गाडी न येता जास्तीत जास्त जणांना प्रवासाची संधी मिळावी, अशी ‘क्विक राइड’ची संकल्पना आहे.’

‘आमच्या वापरकर्त्यांना ‘पॉइंट सिस्टीम’द्वारे पुरस्कृत केले जाते. या पॉइंट्सचा वापर करून ते त्यांच्या इंधनाचा खर्च भरून काढू शकतात. ‘क्विक राइड’ने आज २० लाख वापरकर्त्यांची नोंदणी केली आहे आणि त्यायोगे आम्ही शहरांमधील ३६ हजार टन कार्बन उत्सर्जन यशस्वीरित्या रोखले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या कामगिरीमुळे आम्ही अत्यंत उत्साहीत झालो आहोत. सन २०२०पर्यंत किमान १० लाख कार्स रस्त्यावरून कमी व्हाव्यात आणि दररोजचे तीन टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यावे, अशी आमची महत्वाकांक्षा आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये आम्ही सेवा उपलब्ध करून देऊन आमच्या प्रवाशांना कोणताही त्रास न होता मुक्त प्रवास करण्यास सक्षम करू शकू,’ असे राव यांनी सांगितले.

सध्या सर्व शहरांमध्ये जागेची अडचण खूप वाढली आहे. मर्यादीत जागांमध्ये खासगी गाड्यांची संख्या वाढत चालल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खासगी वाहनांची नोंदणी अगदी उच्च स्तरापर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच या प्रदूषणाच्या व कोंडीच्या प्रश्नांबाबत अत्यंत सजग असलेल्या नागरिकांचे समुदाय निर्माण करण्याचा ‘क्विक राइड’चा हेतू आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search