Next
दत्त अनुभूती
BOI
Thursday, December 07 | 11:21 AM
15 0 0
Share this story

हे आध्यात्मिक अनुभूती देणारे लेखन आहे. आनंद कामत यांनी आपल्याला आलेल्या अनुभूतीवर आधारित हे लेखन केले आहे. ‘लेखनाचे उद्दिष्ट हे फक्त अध्यात्म खरोखरी कळावे आणि प्रत्येकाचा ओढा कुठेतरी योग्य ठिकाणी व्हावा, इतकेच आहे’, असे कामत यांनी मनोगतात नमूद  केले आहे.  

शरीर अजिबात साथ देत नसतानाही त्यांनी गिरनारची ११वी फेरी केली. ती स्वामी महाराजांच्या कृपेने असे ते सांगतात. गिरनारच्या वारीची सुरुवात कशी झाली, साई उधीचा महिमा, व्याघ्र दृष्टांत असे क्रमाक्रमाने अनुभव वाचायला मिळतात. वाटेत संकटे आली, तरी महाराजांच्या कृपेने त्यांनी ती पार केली. याचे वर्णन पुस्तकात वाचायला मिळते. पदुकास्पर्शाचा अद्भुत अनुभव त्यांनी सांगितला आहे. प्रत्येकानेच गिरनार वारी अनुभवावी, असा संदेश ते देतात.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : १२८
किंमत : ११६ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link