Next
'ते' अनोखे जोडपे
BOI
Monday, September 10, 2018 | 03:15 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ते दोघे एकाच कंपनीत काम करतात... एकत्र जेवतात.. एकत्र फिरतात... एकत्रच राहतात... इतकेच नव्हे, तर नवरा-बायकोसारखे भांडतातही. असे हे हटके कपल आहे समीर समुद्र आणि अमित गोखले यांचे. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना मान्यता दिल्यानंतर गेल्या कैक वर्षांपासून समाजाच्या रोषाला बळी पडलेल्या या जोडप्याने मोकळा श्वास घेतला. समलिंगी जोडप्यांना मूलभूत अधिकार मिळाल्यानंतर समीर आणि अमित यांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

अमित आणि समीर यांनी १२ वर्षांपुर्वी अमेरिकेत लग्न केले, जेव्हा भारतात समलिंगी संबंधांना मान्यता नव्हती. दोघेही अभियंता असल्याने दोघांनाही तिकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. तब्बल पंधरा वर्षांनतंर काही काळापूर्वीच हे जोडपे पुण्यात स्थायिक झाले. नुकताच समलिंगी संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्याचा निर्णय झाला आणि या जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. या निर्णयामुळे आता ते समाजात उजळ माथ्याने जगू शकतात. या जोडप्याचा अनोखा संसार कसा असेल? ते कसे राहत असतील? त्यांचे हे शेअरिंगचे आयुष्य कसे असेल? या अर्थातच सर्वांसाठी कुतुहलाच्या गोष्टी आहेत. 

पुण्यातील बाणेर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत दहाव्या मजल्यावर समीर आणि अमित यांचा आलिशान फ्लॅट आहे. सर्वसाधारणपणे नवरा-बायकोचे घर म्हटले, की ते जरा तरी अस्ताव्यस्त असतेच. परंतु इथे मात्र हे चित्र पाहायला मिळत नाही.... चार खोल्याचा हा फ्लॅट आहे. सर्वत्र चकचकीतपणा दोघांमध्ये विशेषतः समीर किचनमध्ये जास्त असतो. त्याला जेवण बनवण्याची आवड आहे. अमितही त्याला या कामात मदत करतो. सकाळी आठ वाजता ऑफिस त्यानतंर दुपारी दोघेही घरीच जेवण करतात. रात्री आठ वाजता आल्यानतंर हे दोघेही जेवण करून फिरायला जातात आणि सुट्टीच्या दिवशी घरातच जेवणासोबत परदेशी वाईनचाही ते आस्वाद घेतात, असे त्यांनी सांगितले. 

याबाबत समीरशी संवाद साधला असता त्याने दोघांच्या आयुष्यातील कैक गोष्टीं मोकळेपणाने शेअर केल्या. समीर म्हणतो, ‘आम्ही एकमेकांसोबत गेली पंधरा वर्षे राहत असल्याने वाद, रुसवे-फुगवे यांच्यासोबत एकमेकांच्या स्वभावाची आता आम्हा दोघांनाही सवय झाली आहे. विशेष बाब म्हणजे आता आमच्या पालकांनीही आम्हांला स्विकारले असून इतरांसारखे आमचे नातेवाईकही आम्हांला भेटायला येतात.’ 

(समीरशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search