Next
प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार
‘भारतीय विद्या भवन’, ‘इन्फोसिस फाउंडेशन’तर्फे आयोजन
BOI
Tuesday, August 07 | 06:11 PM
15 0 0
Share this story

‘कन्याकुमारी ते लेह (केटूएल) मोहिमेत सहभागी प्रा. वासंती जोशी, शुभदा जोशी यांच्या समवेत केतकी जोशी व गायत्री फडणीस.

पुणे : ‘‘महिलांनी भीतीवर मात करावी, ‘कॉन्करिंग द फिअर’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी ‘कन्याकुमारी ते लेह-लडाख’ हे अंतर सायकलवरून यशस्वीरीत्या पार करणाऱ्या प्रा. वासंती जोशी यांचा ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट, रोजी संध्याकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे’, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.

‘पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील प्रा. वासंती जोशी यांनी केवळ ३५ दिवसात कन्याकुमारी ते लेह-लडाख हे अंतर सायकल चालवत पूर्ण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी, २८ मे रोजी त्यांनी या सायकल मोहिमेला सुरूवात केली होती आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापना दिनी पाच जुलैला या मोहिमेची सांगता झाली. त्यांनी चार हजार १२० किमी हे अंतर एकटीने सायकलवरून पार केले असले, तरी त्यांच्या या उपक्रमात त्यांची कन्या केतकी जोशी, विद्यार्थिनी गायत्री फडणीस-परांजपे व ‘गिरीकंद ट्रॅव्हल्स’च्या संचालिका शुभदा जोशी अशा तिघींची सहभाग होता. या धाडसी मोहिमेच्या यशाबद्दल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या वतीने येत्या रविवारी, या सर्वांचा सत्कार करण्यात येणार असून, या वेळी वासंती जोशी यांची मुलाखत आणि या मोहिमेचे दृक श्राव्य स्वरूपातील अनुभव कथनही सादर केले जाणार आहे. सर्व क्रीडा व सायकल प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे’, असे आवाहन काकिर्डे यांनी केले आहे. 

कार्यक्रमाविषयी : 
प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार
स्थळ : भारतीय विद्या भवन, सेनापती बापट मार्ग 
वेळ : रविवार, १२ ऑगस्ट, सायंकाळी सहा वाजता

(या मोहिमेविषयीची संपूर्ण माहिती आणि मोहिमेपूर्वीची वासंती जोशी यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link