Next
आनंद भाटे यांना वैष्णव पुरस्कार जाहीर
BOI
Wednesday, June 26, 2019 | 02:40 PM
15 0 0
Share this article:

पुणे : स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य, प्रसिद्ध शास्त्रीय गायक आनंद भाटे यांना कै. ह. भ. प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएलतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमात भाटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पाच जुलै २०१९ रोजी मयूर कॉलनी येथील एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, अकरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आनंद भाटे हे किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक असून, ठुमरी व नाट्यसंगीत ही त्यांच्या गायकीची खासियत आहे. त्यांनी अगदी लहान वयातच संगीत शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी दूरदर्शनवर पहिले गायन सदरीकरण केले. त्यानंतर सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास आजवर अखंड सुरू असून, रसिक श्रोत्यांचेही त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे. बालगंधर्व चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय प्रभा अत्रे पुरस्कार, आनंदगंधर्व पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search