Next
‘सीताफळ संशोधनात कसपटे यांचे कार्य मोलाचे’
BOI
Saturday, May 26, 2018 | 02:28 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रयोगशील शेतकरी कृषिरत्न नवनाथ कसपटे यांनी सीताफळाच्या संशोधनात केलेले कार्य मोलाचे आहे,’ असे गौरवोद्गार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काढले.

गोरमाळे येथे कसपटे यांच्या मधुबन फार्म आणि नर्सरीस जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत माजी आमदार राजेंद्र राऊत, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रकल्प संचालक रवींद्र माने, बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, दत्तात्रय कुलकर्णी आणि  परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘नवनाथ कसपटे यांच्याकडून सीताफळासाठी  शेतकऱ्यांना होत असलेले मार्गदर्शन कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभव, संशोधनाचा लाभ घेऊन नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या या फळपिकाकडे वळावे.’ या प्रसंगी शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.  प्रारंभी प्रा. शिंदे यांनी कसपटे यांच्या सीताफळ बागेची पाहणी केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link