Next
पुणे मेट्रो बैठक
प्रेस रिलीज
Thursday, January 11 | 02:32 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘पुणे मेट्रोच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उद्भवणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी लवकरच महानगर पालिका, संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या प्रत्येक विभागाशी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे,’ खासदार अनिल शिरोळे यांनी पुणे मेट्रोचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांच्यासोबत १० जानेवारी रोजी घेतलेल्या बैठकीनंतर सांगितले. 

पीएमपीएमएलशी संबधित असलेला, स्वारगेट येथील मल्टीनोडल हबसंबंधी प्रश्न, तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून तातडीने सोडविणार असल्याची माहिती नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी बैठकीत दिली. 

मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, पुढील आठवड्यात महानगरपालिका अधिकारी तसेच वाहतूक विभाग यांच्यासमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link