Next
समीर चौघुलेचे हिंदी चित्रपटात पदार्पण
BOI
Monday, January 14, 2019 | 06:19 PM
15 0 0
Share this story

शरद सक्सेना व समीर चौघुले

मुंबई : मराठीतील एक उत्तम विनोदवीर, अभिनेता समीर चौघुले लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. खुद्द त्यानेच ही माहिती फेसबुकवर दिली आहे. 

समीर चौघुलेने हिंदी चित्रपटाच्या सेटवरील अभिनेता शरद सक्सेना यांच्यासोबतचा एक फोटो फेसबुकवर टाकला आहे. ‘उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये हिंदी सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे. माझ्यासोबत जवळपास ४०० चित्रपटांत काम केलेले अभिनेता शरद सक्सेना आहेत. ते खूपच प्रेमळ आणि चांगले व्यक्ती आहेत. आठ अंश सेल्सिअस तापमानात चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे,’ अशी पोस्ट टाकली आहे. 

फोटोत समीर चौघुले आणि शरद सक्सेना दोघेही पारंपरिक कपड्यात दिसत असून, चित्रपटातील कौटुंबिक सोहळ्याचा प्रसंग असावा असे वाटते. मात्र, कोणत्या चित्रपटासाठी हे चित्रीकरण सुरू आहे, त्याचे नाव, कथानक, अन्य कलाकार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करत असणारा हा अभिनेता आपल्या आगामी हिंदी चित्रपटाबाबतची माहिती कधी देतोय, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link