Next
एकल वाद्यवादन स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद; ओम साई मित्रमंडळातर्फे आयोजन
BOI
Tuesday, August 13, 2019 | 04:57 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
साळवी स्टॉप-नाचणे रोड येथील ओम साई मित्रमंडळातर्फे नुकतीच एकल (सोलो) वाद्यवादन स्पर्धा उत्साहात पार पडली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मलुष्टे, उपाध्यक्ष संदीप मगदूम, खजिनदार अनंत आगाशे, सेक्रेटरी श्रीकांत शेंडगे उपस्थित होते. प्रसिद्ध तबलावादक रोहिदास परब, प्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रसाद गवस आणि प्रसिद्ध कीबोर्ड वादक-संगीत संयोजक वैभव फणसळकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. 

प्रत्येक वाद्यविभागाचे वयोगटानुसार दोन गट करण्यात आले होते. लहान गट सात ते १६ वर्षे आणि मोठा गट १७ ते ३० वर्षे असा होता. प्राथमिक फेरीतून ४५ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते.

स्पर्धेचा निकाल असा - 
तबला (लहान गट) प्रथम - सारंग जोशी, द्वितीय - स्वरूप नेने, तृतीय - गंधार जोगळेकर.
तबला (मोठा गट) प्रथम - किरण लिंगायत, द्वितीय - सोहम जोशी, तृतीय - ओंकार ब्रीद. 
हार्मोनियम (लहान गट) प्रथम - श्रीरंग जोगळेकर, द्वितीय - श्रावणी संकपाळ, तृतीय - मयूरेश गाडगीळ, उत्तेजनार्थ - ओजस करकरे. 
सिंथेसायझर (लहान गट) स्टीफन पालखे, मोठा गट - भूषण वायंगणकर. 
गिटार/मेंडोलीन - प्रथम - रोशन खैरे. 
पखवाज (लहान गट) प्रथम - हरिदास घेवडे.
पखवाज (मोठा गट) प्रथम - सूरज तिवरेकर, द्वितीय - तेजस नांदगावकर.
ढोलकी (लहान गट) प्रथम - सागर वीर.
ढोलकी (मोठा गट) प्रथम - मिलिंद लिंगायत, द्वितीय - संकेत म्हापणकर.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search