Next
'पासपोर्ट प्रक्रिया आता अधिक सोपी आणि सुटसुटीत'
BOI
Friday, October 05, 2018 | 05:19 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पासपोर्टबद्दल प्रक्रियेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठीच, गेल्या काही वर्षांत आम्ही पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सोपी केली आहे. पासपोर्ट हे सीमोल्लंघनाचे प्रतिक आहे. जगात फिरण्याचा अनुभव घेतल्यावर निश्चितच आपले संकुचित विचार बदलण्यास मदत होईल’, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. ‘नवभारत निर्मिती’तर्फे आयोजित एका उपक्रमात ते बोलत होते.  

विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच सहजपणे पासपोर्ट मिळावेत, यासाठी ‘नवभारत निर्मिती’ने सुरू केलेल्या ‘माती-पंख-आकाश’ या उपक्रमाचे उद्‌घाटन ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील एस. पी. महाविद्यालयाच्या, लेडी रमाबाई सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी मुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, 'देशात दोन वर्षांपूर्वी ७७ पासपोर्ट कार्यालये कार्यरत होती. परराष्ट्र मंत्रालयाने केलेले नियोजन आणि कार्यवाहीमुळे आता देशाच्या विविध भागांत २२० पासपोर्ट कार्यालये सुरू झाली आहेत. दररोज ६० हजार पासपोर्टवर कार्यवाही केली जाते. गेल्या वर्षभरात एक कोटी १० लाख पासपोर्ट वितरित करण्यात आले आहेत. आज भारतात ८ कोटी लोकांकडे पासपोर्ट आहेत.’

या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. के. जैन, प्राचार्य डॉ. दिलीप सेठ आणि नवभारत निर्मितीचे समन्वयक योगेश गोगावले उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search