Next
विरोधीपक्ष नेत्यांकडूनही वायुदलाचे अभिनंदन
BOI
Tuesday, February 26, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this story


मुंबई : भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादयांच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या विरोधी पक्ष नेत्यांनीही भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले.

‘हा ट्रेलर;पिक्चर कधी रिलीज करायचा हे सैन्य ठरवेल’- धनंजय मुंडे

‘आजची भारताच्या सैन्यक्षमतेची केवळ झलक आहे. या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा हे सैन्याचे नेतृत्व योग्य वेळी ठरवेल,’ अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले. 

धनंजय मुंडे
भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादयांच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल विधानपरिषदेत त्यांनी भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले.

‘भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवादयांचा खात्मा केला आणि आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश-ए- मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्करे-ए-तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे,’असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

अजित पवार
‘भारतीय सेनेच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान’ - अजित पवार 

 ‘देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल, तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाकव्याप्त भागात भारतीय सेनेने केलेल्या हल्ल्याचे कौतुक करत अभिनंदन केले.

‘भारतीय सेनेने पुलवामा घटनेचे चोख उत्तर दिले आहे. यात भारतीय नागरिक म्हणून आम्ही सहभागी आहोत,’ असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील‘पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय स्वागतार्ह’ - जयंत पाटील
 
‘भारत सरकारने पाकिस्तानला जो धडा शिकवण्याचे ठरवले आहे ते स्वागतार्ह आहे. काश्मीरचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी भारतीय सेना समर्थ आहे इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश स्वतंत्र करून पाकिस्तानला धडा शिकवला. तीच संधी पुन्हा एकदा आपल्या देशाला आली आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचे कौतुक केले.    
 
‘पाकिस्तान नेहमीच काश्मीरचा प्रश्न हा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. काश्मीरमधील अशांततेला पाकिस्तान जबाबदार आहे, यात शंका नाही,’ असेही  पाटील म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link