Next
कीटकनाशक वापराच्या जागृतीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Tuesday, June 12, 2018 | 04:18 PM
15 0 0
Share this story

कीटकनाशकांचा वापर सुरक्षितपणे कसा करावा याबाबत मार्गदर्शन करताना तज्ज्ञ.पुणे : पीक संरक्षक उत्पादनांचा सुरक्षित, जबाबदार वापर करण्यासाठी आणि कीटकनाशकांच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘एफएमसी’ या संस्थेच्या वतीने जिल्हाभरात ठिकठिकाणी प्रॉडक्ट स्टीवर्डशीप डे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात शेतकरी आणि कीटकनाशक विक्रेते सहभागी झाले होते. देशभरात एकाच दिवशी जवळपास १५ राज्यांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने पेरणीपूर्वी लाखो शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा झाला आहे. या वेळी शेतकऱ्यांना मोफत सुरक्षा साधनांच्या संचाचे वाटप करण्यात आले.

‘एफएमसी’ इंडिया या संस्थेचे प्रमोद थोटा म्हणाले, ‘अळी, किडी आणि कीटकापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीटकनाशकांचा वापर योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. कीटकनाशकांच्या उत्पादनावरील सूचनाबाबत शेतकऱ्यांना शिक्षण देऊन वापराचे महत्त्व पटवून देणे, योग्य त्या प्रमाणात योग्य, वेळी योग्य उत्पादन व सुरक्षा सामुग्रीचा वापर करणे गरजेचे आहे. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. योग्य ते उत्पादन योग्य सुरक्षात्मक उपकरणांसह आणि लेबलवर दिलेल्या अचूक नियमानुसार वापरले पाहिजे. ज्यामुळे या कीटकनाशकाद्वारे केवळ पिकाचे संरक्षणच नाही तर वापर करणारे, पर्यावरण आणि माणसासाठी देखील सुरक्षित असली पाहिजेत.’

एक जबाबदार संस्था म्हणून ‘एफएमसी’ने सुरक्षित कीटकनाशकांचा वापरासोबतच बनावट उत्पादनांच्या विषयावरही शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. यासाठी संस्था कृषी अधिकारी, उद्योग संघटना आणि शेतकरी संघटनांसोबत काम करीत आहे. ‘एफएमसी’ने कीटकनाशक वितरक आणि शेतकऱ्यांना बनावट उत्पादने आणि मूळ उत्पादने यातील फरक ओळखण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचा धोका कमी झाला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link