Next
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 11:16 AM
15 0 0
Share this article:


पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला. 

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सचिन सातव, म. ए. सोसायटी नियामक मंडळ सदस्य आणि देशपांडे विद्यालयाचे महामात्र गोविंदराव कुलकर्णी, सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, तहसीलदार विजय पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, उपअधीक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, सहायक निबंधक श्री. करे, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुभाष बर्गे, प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड, प्रमुख प्रशिक्षक बारामती कराटे असोशिएशनचे प्रो. रवींद्र कराळे, सायकल कल्बचे पदाधिकारी व सदस्य, आजी–माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, शासकीय अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक व खेळाडू, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक असे मिळून सुमारे चार हजार ७०० जण यात सहभागी झाले होते. 


योग प्रशिक्षक दादासो शिंदे व अनिल गावडे यांनी योगाभ्यास करून घेतला. या बरोबरच माळेगाव बुद्रुक येथील बारामती तालुका क्रीडा संकुलातही आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सुमारे साडेतीनशे लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून योगदिन उत्साहात साजरा केल्याची माहिती बारामती तालुका क्रीडा अधिकारी लकडे यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search