
हिमायतनगर : नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका प्रमुखपदी रामभाऊ ठाकरे, उप-तालुका प्रमुखपदी विलास वानखेडे, तालुका संघटकपदी संजय काईतवाड, शहर प्रमुखपदी प्रकाश रामदिनवार, रामू नरवाडे, शहर संघटकपदी गजानन पाळजकर आदींची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या शिफारशीनुसार या निवडी झाल्याचे सांगण्यात आले.
या निवडीनंतर हिमायतनगरच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मजबूत वाढवण्यासाठी ही नूतन कार्यकारिणी नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

या नव्या कार्यकारिणीच्या सदस्यांचे शहरात ठिकठिकाणी जनतेकडून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष कुणाल राठोड, विजय वळसे-पाटील, विठ्ठल ठाकरे, अरविंद पाटील, विशाल राठोड, योगेश चिल्कावार, दिनेश सूर्यवंशी यांनी नव्या कार्यकर्त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.