Next
ईदनिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान सप्ताह
BOI
Tuesday, August 13, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद हा त्याग आणि दान करण्याची शिकवण देणारा सण आहे. या दिनाचे औचित्य साधून मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबिर सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून हे रक्तदान अभियान आयोजित केले जात आहे. या वेळी सर्व समाजातील नागरिकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर, आयोजक शमसुद्दिन तांबोळी आदी उपस्थित होते. १२ ऑगस्टला सुरू झालेला हा राज्यव्यापी सप्ताह १९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

‘जात-धर्मापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देण्याचे काम अशा उपक्रमांतून केले जात आहे. हजरत महमंद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश देऊन मानवाच्या कल्याणासाठीच धर्मस्थापना केली. आजच्या परिस्थितीचा विचार करता, सर्वधर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजभिमुख करण्याची गरज आहे’, अशा भावना मान्यवरांनी या वेळी व्यक्त केल्या. 

‘रक्ताला जात, धर्म नसतो. प्राण्यांचे रक्त सांडण्यापेक्षा माणसाला उपयोगी पडणारे, जात-धर्मापलीकडे जाऊन मानवतेचे नाते जोपासणारे रक्त एकमेकांच्या उपयोगासाठी द्यावे, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक सणवार समाजाभिमुख, मानवतावादी व्हावेत यादृष्टीने हा उपक्रम सुरू केला असून, संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जात आहे. आता कोल्हापूर, सांगली, सातारा  भागात जीवित, वित्तहानी झाली आहे. तिथे रक्ताचीही गरज आहे. हे लक्षात घेऊन या सप्ताहात संकलित होणारे रक्त तिथे पाठवण्यात येणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने ५१ हजार रुपयांची मदतही पूरग्रस्तांना केली आहे. असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. धर्माचे उन्नयन यातून केले आहे. माणसांनी माणसांसाठी जगण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे,’ अशी भावना आयोजक शमसुद्दिन तांबोळी यांनी व्यक्त केली.  
 
(आयोजक शमसुद्दिन तांबोळी यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search