Next
‘पीएनजी’च्या दुकानांत मिळणार ‘फॉरएवरमार्क’ हिरे
प्रेस रिलीज
Saturday, July 06, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

‘फॅब फाइव्ह’ कलेक्शनपुणे : मूल्य आणि विश्वासाचे उत्तम उदाहरण असलेल्या पीएनजी ज्वेलर्स ब्रँडने ‘फॉरएवरमार्क’ या डी बिअर्स ग्रुपच्या हिरेब्रँडशी भागीदारी केली असून, ‘पीएनजी’च्या भारतातील सर्व दुकानांमध्ये आता ‘फॉरएवरमार्क’ हिऱ्यांची विक्री केली जाणार आहे.

जगातील सर्वाधिक काळजीपूर्वक निवडले जाणारे हिरे म्हणून ‘फॉरएवरमार्क’चे नाव आहे, तर हिरे दागिन्यांमधील अचूकपणा आणि गुणवत्ता यासाठी ‘पीएनजी’ प्रसिद्ध आहे. या दोन्ही ब्रँडच्या भागीदारीने गेल्या काही वर्षांत सर्वाधिक सुंदर, दुर्मिळ आणि खात्रीशीर स्रोतांमार्फत हिरे उपलब्ध करून देण्याचा मार्ग खुला झाल्याने अस्सल हिऱ्यांचे दागिने ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.

ही भागीदारी अधोरेखित करण्यासाठी ‘पीएनजी’ने ‘फॉरएवरमार्क’ हिऱ्यांनी जडवलेली ‘फॅब फाइव्ह’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण मालिकाच तयार केली आहे. प्रत्येक हिऱ्यावर एक विशिष्ट क्रमांक कोरण्यात आला असल्याने अस्सल, नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या तो घडवला गेला नसल्याची हमी मिळते. या संग्रहात उत्कृष्ट अंगठ्यांचे सेट्स, इअरिंग्ज, पेंडंट्स, तन्मणी (मंगळसूत्र पेंडंट) आणि ब्रेसलेट्स हे दागिने अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना ‘पीएनजी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘आमच्या सर्वच दुकानांमध्ये ‘फॉरएवरमार्क’सोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘फॉरएवरमार्क’च्या काटेकोर हिरे निवड प्रक्रियेप्रमाणेच, ‘पीएनजी’चा प्रत्येक दागिना हा अनेक परीक्षणांमधून जात असल्याने आम्ही आमच्या ग्राहकांना केवळ सर्वोत्कृष्टच हिरे दागिने देत असल्याची हमी मिळते. जगातील हिऱ्यांपैकी एक टक्क्यांहून कमी हिरेच ‘फॉरएवरमार्क’च्या निकषांत बसतात हे आम्हाला माहित आहे; तसेच आम्ही सर्वांत जास्त सुंदर हिऱ्यांचे दागिने तयार करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.’

‘फॅब फाइव्ह’ कलेक्शन सादर करताना ‘पीएनजी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ आणि ‘फॉरएवरमार्क’चे अध्यक्ष सचिन जैन‘आमच्या नवीन ‘फॅब फाइव्ह' कलेक्शनमध्ये आम्ही ‘फॉरएवरमार्क’ हिऱ्यांचा वापर केला असल्याने आमच्या  प्रत्येक दागिन्यांची चमक, तर वाढली आहेच; पण त्याच सोबत आमच्या ग्राहकांशी असलेले आमचे नाते आणि विश्वास जास्त दृढदेखील झाला आहे. या संग्रहातील दागिने हे खिशाला सहज परवडतील असे आहेत आणि दैनंदिन वापरासाठी यामध्ये पाच मुख्य दागिने आहेत,’  असे गाडगीळ यांनी सांगितले.

‘फॉरएवरमार्क’चे अध्यक्ष सचिन जैन म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्ससोबत त्यांच्या सर्वच दुकानांमध्ये भागीदारी केल्याचा ‘फॉरएवरमार्क’ला अभिमान आहे. ज्या विक्रेत्यांच्या मनात हिऱ्यांच्याबाबतीत आम्हाला वाटते तशीच उत्कट भावना आहे आणि ब्रँडचे अतिशयक काटेकोर व्यापार निकष, सामाजिक आणि पर्यावरणाच्याबाबतीत जे अतिशय प्रामाणिक आहेत त्यांच्याशीच आम्ही व्यापार सहयोग करतो. १८७ वर्षांपेक्षा जास्त वारसा असणारे ‘पीएनजी’ हे देशातील एक सर्वाधिक प्रतिष्ठित ज्वेलर्स आहेत.  ‘फॉरएवरमार्क’साठी ही भागीदारी एक मैलाचा दगड आहे आणि ‘पीएनजी’सोबत आम्हाला मजबूत नात्याची अपेक्षा आहे. ‘फॅब फाइव्ह’ कलेक्शन ही या नाते संबंधाची सुरुवात आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search