Next
‘जिज्ञासा’तर्फे मे महिन्यात शिबिर
BOI
Thursday, March 01, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘गेली ३३ वर्षे सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या रत्नागिरीच्या नामांकीत जिज्ञासा थिएटर्स या संस्थेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सहा ते १०६पर्यंत सर्वांसाठी एका आगळ्या वेगळ्या धम्माल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्वच घटकांना सामावून घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे’, अशी माहिती नाट्यशास्त्र तज्ज्ञ अक्षता भोळे यांनी दिली.

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की लहान मुलांपासून ते अगदी घरातील ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनांच सुट्टीत काय करायचे असा प्रश्न भेडसावत असतो. आज्जी-आजोबांपासून नातवांपर्यंत सर्वांनाच समाविष्ट करून घेणाऱ्या या धम्माल शिबिरासाठी छोटा गट वय वर्षे सहा ते नऊ, लहान गट वय वर्षे १० ते १५, युवक गट वय वर्षे १६ ते ३५, मोठा गट वय वर्षे ३६ ते ५५ आणि ज्येष्ठ गट वय वर्षे ५६ ते १०६ अशा गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठी मर्यादीत प्रवेश देण्यात येणार आहेत.

हे शिबीर पाच ते २७ मे २०१८ या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले असून, निवड झालेल्या शिबिरार्थींना हस्तकला, चित्रकला, रंगकला, मूर्तीकला, मुखवटे, खेळ, जादू, नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध प्रकारांतील धम्माल अनुभवता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना विविध करमणुकीसह आरोग्याविषयीचे मार्गदर्शनही करण्यात येईल. साधन सामुग्री आयोजकांकडून पुरविण्यात येणार असून, त्यासाठी वेगळा आकार द्यावा लागणार नाही. सर्व शिबिरार्थींना शिबिराच्या कालावधीत अल्पोपहार देण्यात येईल.

‘जिज्ञासा’चे अध्यक्ष सुहास भोळे यांच्यासह अक्षता भोळे, जादुगार विनयराज, राजकिरण दळी, लहु घाणेकर आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘जिज्ञासा’ची दोन शिबिरे यशस्वीपणे पूर्ण केलेले देवव्रत पवार व शर्वाणी ढवळे यांचीही साथ लाभणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८३२९४ ३३७२३, ९४२२४ ३२३८८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search